GK Questions in Marathi | GK in marathi question with answer 2026
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. MPSC, UPSC, SSC, Police Bharti, Talathi Bharti आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात.
या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी निवडक आणि महत्त्वपूर्ण GK Questions in Marathi सोबत त्यांच्या अचूक उत्तरांसह सादर करत आहोत. हे प्रश्न तुमची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
दररोज अशा प्रकारचे प्रश्न सोडवून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता आणि परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
GK Questions in Marathi

प्र.1) बावन दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
👉 उ. छ. संभाजीनगर
प्र.2) पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
👉 उ. यवतमाळ
प्र.3) Central Institute of Road Transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे?
👉 उ. पुणे
प्र.4) जंजीरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. रायगड
प्र.5) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. सांगली
प्र.6) भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे?
👉 उ. NH 6
प्र.7) भंडारा जिल्ह्याचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर (2011) किती आहे?
👉 उ. 982
प्र.8) मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. तुमसर
प्र.9) बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
👉 उ. 6
प्र.10) जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
👉 उ. कुंडलिका
प्र.11) श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे?
👉 उ. रोठा
प्र.12) महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य ‘कन्हाळगाव’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. चंद्रपूर
प्र.13) ‘महाबळेश्वर’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. सातारा
प्र.14) देशातील सर्वांत मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?
👉 उ. इचलकरंजी
प्र.15) महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे?
👉 उ. वर्धा
प्र.16) भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. पुणे
प्र.17) आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना ‘वसंतदादा पाटील’ कोठे आहे?
👉 उ. श्रीरामपूर
प्र.18) रायगड जिल्ह्यात ‘भात संशोधन केंद्र’ कोठे आहे?
👉 उ. कर्जत
प्र.19) ‘हर्णे बंदर’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. रत्नागिरी
प्र.20) चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीटे इत्यादी छपाई केंद्र (सिक्युरिटी प्रेस) महाराष्ट्रात कोठे आहे?
👉 उ. नाशिक
प्र.21) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे?
👉 उ. आंबोली
प्र.22) छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. बुलढाणा
GK in marathi question with answer

प्र.23) नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
👉 उ. हैदराबाद
प्र.24) भारतात आशियातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
👉 उ. रेवा (मध्यप्रदेश)
प्र.25) देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे?
👉 उ. तारापूर
प्र.26) देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
👉 उ. अंजी नदी
प्र.27) भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
👉 उ. NH 44
प्र.28) पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला?
👉 उ. 1986
प्र.29) सुवर्ण मंदिर (Golden Temple) कोठे आहे?
👉 उ. अमृतसर
प्र.30) पायरोस्ट्रिया लालजी (Pyrostria laljii) या वृक्षाचा शोध कोठे लागला?
👉 उ. अंदमान व निकोबार
प्र.31) स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे?
👉 उ. 182 मीटर
प्र.32) भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे?
👉 उ. 1643 किमी
प्र.33) सिक्कीम राज्याची राजधानी कोणती?
👉 उ. गंगटोक
प्र.34) राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण काय आहे?
👉 उ. 2:3
प्र.35) भारतातील पहिला लोहमार्ग कोणता आहे?
👉 उ. मुंबई ते ठाणे
प्र.36) कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
👉 उ. उत्तर प्रदेश
प्र.37) भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला कोण?
👉 उ. अंतरा मेहता
प्र.38) भारतात जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो?
👉 उ. मोसमी वारे
प्र.39) भारताचे तिन्ही सैन्यदलाचे पहिले CDS प्रमुख कोण होते?
👉 उ. बिपीन रावत
प्र.40) भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?
👉 उ. सिरम इन्स्टिट्यूट
प्र.41) इंडियन मिलिटरी अकादमी कोठे आहे?
👉 उ. डेहराडून
Maharashtra gk in marathi

प्र.42) सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
👉 उ. पैनगंगा
प्र.43) नांदूर मधेश्वर, लोणार सरोवर, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य यांना कोणता दर्जा प्राप्त झाला आहे?
👉 उ. रामसार दर्जा
प्र.44) अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. पालघर
प्र.45) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. रायगड
प्र.46) अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. सातारा
प्र.47) थाळनेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. धुळे
प्र.48) बिंदूसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. बीड
प्र.49) नळगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. बुलढाणा
प्र.50) अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. वाशिम
प्र.51) येडशी रामलिंगे घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. धाराशिव
प्र.52) काटेपूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. अकोला
प्र.53) राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. कोल्हापूर
प्र.54) फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. रायगड
प्र.55) कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
👉 उ. रामटेक
प्र.56) महात्मा ज्योतीबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) चे मुख्यालय कोठे आहे?
👉 उ. नागपूर
प्र.57) भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) कोठे आहे?
👉 उ. मुंबई
प्र.58) साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. नाशिक
प्र.59) इटियाडोह धरण कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. अर्जुनी मोरगाव
प्र.60) सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून कोणती नदी वाहते?
👉 उ. कृष्णा नदी
प्र.61) समृद्धी महामार्ग अहमदनगर, ठाणे, पुणे, वाशिम यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
👉 उ. पुणे
प्र.62) लालक्रांती कशाशी संबंधित आहे?
👉 उ. मांस उत्पादन
प्र.63) सोनेरी क्रांती कशाशी संबंधित आहे?
👉 उ. मध उत्पादन
Maharashtra gk question in marathi

प्र.64) गोलक्रांती कशाशी संबंधित आहे?
👉 उ. बटाटा
प्र.65) संस्कृत कवी कालिदासाने रामटेक येथे कोणते काव्य रचले?
👉 उ. मेघदूत
प्र.66) भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
👉 उ. कृष्णा नदी
प्र.67) समृद्धी महामार्ग अकोला, वर्धा, अमरावती, वाशिम पैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
👉 उ. अकोला
प्र.68) ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत कोणत्या कवीने लिहिले आहे?
👉 उ. राजा निळकंठ बढ़े
प्र.69) रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
👉 उ. NH-166
प्र.70) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
👉 उ. दापोली
प्र.71) ‘नीलक्रांती’ कोणत्या उत्पादन वाढीशी संबंधित आहे?
👉 उ. मत्स्योत्पादन
प्र.72) कार्यकारी लोकसंख्येत कोणत्या वयोगटाचा समावेश होतो?
👉 उ. 15 ते 59 वर्षे
प्र.73) पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला?
👉 उ. 1 ऑगस्ट 2014
प्र.74) खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही?
👉 उ. सावित्री
प्र.75) गोदावरी खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून कोणत्या डोंगररांगांमुळे वेगळे झाले आहे?
👉 उ. सातमाळा-अजिंठा डोंगररांगा
प्र.76) पावसाळ्यात विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्यमान कसे बदलते?
👉 उ. वाढत जाते
प्र.77) महाराष्ट्राच्या हवामानावर कोणाचा प्रमुख प्रभाव पडतो?
👉 उ. सह्याद्री पर्वत
प्र.78) ‘खेड’ नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यांत आहे?
👉 उ. रत्नागिरी व पुणे
प्र.79) ‘कर्जत’ नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यांत आहे?
👉 उ. रायगड व अहमदनगर
प्र.80) ‘कळंब’ नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यांत आहे?
👉 उ. धाराशिव व यवतमाळ
प्र.81) ‘नांदगाव’ नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यांत आहे?
👉 उ. नाशिक व अमरावती
प्र.82) किनारी कोकण कृषी विभाग कोणत्या प्रमुख पिकासाठी ओळखला जातो?
👉 उ. भात व नारळ
Simple gk questions in marathi

प्र.83) ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय आहे?
👉 उ. वायूमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक
प्र.84) लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
👉 उ. सायट्रिक आम्ल
प्र.85) न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित सूत्र कोणते?
👉 उ. F = ma
प्र.86) आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला?
👉 उ. डायनामाइट
प्र.87) इन्सुलिनचे स्त्रवण कोणत्या अवयवातून होते?
👉 उ. स्वादुपिंड
प्र.88) ‘हर्टझ’ हे कोणत्या मापनाचे एकक आहे?
👉 उ. वारंवारता
प्र.89) यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
👉 उ. पचनसंस्था
प्र.90) रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात?
👉 उ. थ्रॉम्बोसिस
प्र.91) ‘रातांधळेपणा’ हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो?
👉 उ. जीवनसत्व ‘अ’ च्या अभावामुळे
प्र.92) शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून तपासणी करण्यास काय म्हणतात?
👉 उ. बायोप्सी
प्र.93) एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट?
👉 उ. 746 वॅट
प्र.94) विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल कोणते?
👉 उ. गुरुत्वाकर्षण बल
प्र.95) कोरडी हवा विजेची कशी असते?
👉 उ. दुर्वाहक
प्र.96) नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या किती असते?
👉 उ. निम्मे
प्र.97) भारतात मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली?
👉 उ. 22 ऑगस्ट 1994
प्र.98) नियमित मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो?
👉 उ. व्हिटॅमिन B
प्र.99) वनस्पती वातावरणातील नायट्रोजन कोणत्या स्वरूपात स्वीकारतात?
👉 उ. नायट्रेट्स
प्र.100) सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला?
👉 उ. आईन्स्टाईन
MPSC GK questions in marathi

प्र.101) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
👉 उ. नागपूर
प्र.102) कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता?
👉 उ. गोंदिया
प्र.103) बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत?
👉 उ. 7
प्र.104) ‘अंबाबारवा अभयारण्य’ बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
👉 उ. संग्रामपूर
प्र.105) बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
👉 उ. 13
प्र.106) सिंदखेड राजा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
👉 उ. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान
प्र.107) अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
👉 उ. असदगड
प्र.108) अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
👉 उ. यवतमाळ
प्र.109) अकोला जिल्ह्यात किती पोलीस ठाणी आहेत?
👉 उ. 23
प्र.110) अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
👉 उ. काटेपूर्णा
प्र.111) पारस येथील विद्युत केंद्रात वीजनिर्मिती कशापासून होते?
👉 उ. कोळसा
प्र.112) जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. बुलढाणा
प्र.113) शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोठे केला?
👉 उ. प्रतापगड
प्र.114) अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कुणाच्या नेतृत्वात झाला?
👉 उ. वीर वामनराव जोशी
प्र.115) ‘ऋणमोचन’ हे मुगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. भातकुली
प्र.116) अमरावती शहरातील ‘माताखिडकी’ मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे?
👉 उ. श्री कृष्ण
प्र.117) अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?
👉 उ. 14
प्र.118) पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?
👉 उ. कस्तुरबा गांधी
प्र.119) ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय’ कोणत्या शहरात आहे?
👉 उ. नागपूर
प्र.120) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. रायगड
प्र.121) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
👉 उ. मुंबई उपनगर
प्र.122) महाराष्ट्रात सर्वांत कमी लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता?
👉 उ. गडचिरोली
General knowledge questions in marathi

प्र.123) कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
👉 उ. रामटेक
प्र.124) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्ये जोडली गेली आहेत?
👉 उ. महाराष्ट्र व गोवा
प्र.125) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
👉 उ. राजेवाडी
प्र.126) अजिंठा लेणी कोणत्या नदीने तयार केलेल्या दरीत वसली आहेत?
👉 उ. वाघूर नदी
प्र.127) फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. कणकवली
प्र.128) भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहेत?
👉 उ. पितळखोरा लेणी
प्र.129) रायगड जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?
👉 उ. 28
प्र.130) मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
👉 उ. वैनगंगा
प्र.131) भारतातील गहू पिकाची जनुकीय पेवी (Gene Bank) कोठे आहे?
👉 उ. कर्नाल
प्र.132) ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
👉 उ. नागपूर
प्र.133) कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे?
👉 उ. चंद्रपूर
प्र.134) MIHAN प्रकल्प कोठे आहे?
👉 उ. नागपूर
प्र.135) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून कोणत्या डोंगररांगा जातात?
👉 उ. बालाघाट डोंगररांगा
प्र.136) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात किती पोलीस उपविभाग आहेत?
👉 उ. 5
प्र.137) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही?
👉 उ. NH 53
प्र.138) ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ कोठे आहे?
👉 उ. पुणे
प्र.139) नैसर्गिक वायुवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे?
👉 उ. अंजनवेल (रत्नागिरी)
प्र.140) सोलापूर कोणत्या लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहे?
👉 उ. चादरी
प्र.141) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
👉 उ. लोणेरे
General knowledge questions and answers in marathi

प्र.142) तावरजा, लेंडी, तेरणा, चंपा, भामा, भीमा यापैकी कोणत्या नद्या लातूरशी संबंधित आहेत?
👉 उ. तावरजा, लेंडी, तेरणा
प्र.143) लातूरचे कोणते सुपुत्र ‘रुस्तम-ए-हिंद’ किताबाने सन्मानित झाले होते?
👉 उ. हरिश्चंद्र बिराजदार
प्र.144) लातूरातील बैलांची कोणती जात प्रसिद्ध आहे?
👉 उ. देवणी
प्र.145) लातूर जिल्ह्यात बने तुलनेने कसे आहेत?
👉 उ. कमी
प्र.146) ‘साईनंदनवन’ हे पर्यटनस्थळ लातूर जिल्ह्यात कोठे आहे?
👉 उ. चाकूर
प्र.147) ‘गंजगोलाई’ बाजारपेठ असणारे शहर कोणते?
👉 उ. लातूर
प्र.148) विशाळगड, सिंहगड, सामानगड, रांगणा यापैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?
👉 उ. सिंहगड
प्र.149) म्हापणे, दुधसागर, आंबोली, राऊतवाडी यापैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे?
👉 उ. राऊतवाडी
प्र.150) राही सरनोबत, अंजली भागवत, वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत यापैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत?
👉 उ. अंजली भागवत
प्र.151) चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे?
👉 उ. कोल्हापूर
प्र.152) खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. शिरोळ
प्र.153) कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला?
👉 उ. 1884
प्र.154) हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. गडचिरोली
प्र.155) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे?
👉 उ. पुणे
प्र.156) रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?
👉 उ. 18
प्र.157) लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?
👉 उ. रत्नागिरी
प्र.158) रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो?
👉 उ. कुंभार्ली घाट
प्र.159) सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे?
👉 उ. दापोली
प्र.160) रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
👉 उ. 4
प्र.161) चपराळा अभयारण्य कुठे आहे?
👉 उ. गडचिरोली
Easy gk question in marathi

प्र.162) NIV (National Institute of Virology) कोठे आहे?
👉 उ. पुणे
प्र.163) भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत?
👉 उ. गडचिरोली
प्र.164) नाशिक, अमरावती, सोलापूर, धाराशिव यापैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही?
👉 उ. धाराशिव (उस्मानाबाद)
प्र.165) अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली?
👉 उ. डॉ. पंजाबराव देशमुख
प्र.166) कामठी, रामटेक, बल्लारपूर, हिंगणा यापैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?
👉 उ. बल्लारपूर
प्र.167) MIHAN औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
👉 उ. नागपूर
प्र.168) ‘माडिया गोंड’ ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही?
👉 उ. नंदूरबार
प्र.169) सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. भंडारा
प्र.170) खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात नाही? (FTII, NCL, NDA, एशियाटिक लायब्ररी)
👉 उ. एशियाटिक लायब्ररी
प्र.171) महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
👉 उ. नागपूर
प्र.172) छ. संभाजीनगर शहर किती दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते?
👉 उ. बावन्न
प्र.173) चिंतामणी पार्श्वनाथ जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?
👉 उ. कचनेर
प्र.174) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. छ. संभाजीनगर
प्र.175) प्रकाशे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. नंदूरबार
प्र.176) महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. आमगाव (गोंदिया)
प्र.177) ‘झिरो माईल’ स्थान कोणत्या शहरात आहे?
👉 उ. नागपूर
प्र.178) पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
👉 उ. छ. संभाजीनगर
प्र.179) पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. नागपूर
प्र.180) एकलहरे (नाशिक) येथे कोणते विद्युत केंद्र आहे?
👉 उ. औष्णिक विद्युत केंद्र
प्र.181) National Film Archive of India कोठे आहे?
👉 उ. पुणे
प्र.182) ‘आंबोली’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. सिंधुदुर्ग
Police bharti gk questions in marathi

प्र.183) भारतातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते?
👉 उ. भिलार
प्र.184) महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
👉 उ. नंदुरबार
प्र.185) कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखले जाते?
👉 उ. नंदवाळ
प्र.186) दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. राधानगरी
प्र.187) तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे?
👉 उ. चंदगड
प्र.188) 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरात कोणी केली?
👉 उ. बाबुराव पेंटर
प्र.189) कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
👉 उ. अमरावती
प्र.190) रामटेक येथे ‘मेघदूत’ हे महाकाव्य कोणत्या कवीने लिहिले?
👉 उ. कालिदास
प्र.191) लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परीक्षेत्रात येतो?
👉 उ. नांदेड
प्र.192) पालघर जिल्ह्यात प्रमुख कोणती आदिवासी जमात आढळते?
👉 उ. वारली
प्र.193) भिवापूर, हिंगणा, काटोल हे नागपूर जिल्ह्यातील तालुके कोणत्या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत?
👉 उ. वर्धा
प्र.194) पालघर जिल्ह्याला गुजरात राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे?
👉 उ. वलसाड
प्र.195) ‘वज्रेश्वरी’ हे गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उ. ठाणे
प्र.196) शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे?
👉 उ. जव्हार
प्र.197) उस्मानाबाद शहराचे नामकरण काय करण्यात आले आहे?
👉 उ. धाराशिव
प्र.198) रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते?
👉 उ. भात
प्र.199) खंदेरी, लोहगड, सरसगड, सागरगड यापैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही?
👉 उ. लोहगड
प्र.200) महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
👉 उ. सावित्री
प्र.201) आक्षी, चरसीली, हर्णे, आरावी यापैकी कोणता समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यात नाही?
👉 Comment your answer
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2026
प्र.202) माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? 👉 उ. 30 दिवस
प्र.203) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या आहे. 👉 उ. 67
प्र.204) कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? 👉 उ. राज्यसभा
प्र.205) राज्यपाल यांना कोण शपथ देतात? 👉 उ. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
प्र.206) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? 👉 उ. राज्यपाल
प्र.207) महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले ‘शक्ती विधेयक’ कशाशी संबंधीत आहे? 👉 उ. महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी
प्र.208) राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणुक कोण करतात? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.209) भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य ….या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. 👉 उ. 51 अ
प्र.210) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? 👉 उ. विधानपरिषद निर्वाचित सदस्य
प्र.211) संसदेमध्ये ‘अप्पर हाऊस’ कशाला म्हणतात? 👉 उ. राज्यसभा
प्र.212) कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता? 👉 उ. बॅ. महमदअली जीना
प्र.213) जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस …. कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. 👉 उ. 356
प्र.214) औरंगाबाद, नागपूर, पणजी, नवी मुंबई यापैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? 👉 उ. नवी मुंबई
प्र.215) भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? 👉 उ. कलम 14 ते 18
प्र.216) धनविधेयक प्रथम …. मध्ये प्रस्तुत केले जाते. 👉 उ. फक्त लोकसभेत
प्र.217) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे, नागपुर, नाशिक, ठाणे यापैकी कोठे आहे? 👉 उ. नागपुर
प्र.218) महाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? 👉 उ. पी.सी. अलेक्झांडर
प्र.219) VVPAT म्हणजे काय? 👉 उ. Voter Verified Paper Audit Trail
प्र.220) मुलभूत कर्तव्ये कोणत्या देशावरून घेतली आहेत? 👉 उ. यू.एस.एस.आर.
प्र.221) अतारांकित प्रश्नासाठी नोटीस कालावधी किती? 👉 उ. 15 दिवस
प्र.222) निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.223) ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 👉 उ. 1986
प्र.224) भारताचे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख कोण? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.225) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण? 👉 उ. उपराष्ट्रपती
प्र.226) राज्यसभेची सदस्य संख्या किती? 👉 उ. 250
प्र.227) देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोण? 👉 उ. संसद
प्र.228) कलम 51-A कशा संबंधी आहे? 👉 उ. मूलभूत कर्तव्ये
प्र.229) नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.230) भारताचा प्रथम नागरिक कोण? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.231) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 👉 उ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्र.232) बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणासाठी कोणती तरतूद? 👉 उ. हेबियस कॉर्पस
प्र.233) राज्य प्रशासन लवाद अध्यक्ष नेमणूक कोण करतो? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.234) Enforcement Directorate कोणत्या मंत्रालयाच्या अधीन आहे? 👉 उ. वित्त
प्र.235) राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? 👉 उ. कधीच नाही
प्र.236) शिक्षक मतदार संघातून विधानपरिषद सदस्य किती निवडले जातात? 👉 उ. एक बारांश
प्र.237) पहिले भाषिक राज्य कोणते? 👉 उ. आंध्र प्रदेश
प्र.238) IPC कोणत्या वर्षी संमत? 👉 उ. 1860
प्र.239) महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य संख्या किती? 👉 उ. 78
प्र.240) राज्यसभेचे अध्यक्ष कोण? 👉 उ. उपराष्ट्रपती
प्र.241) राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? 👉 उ. सरन्यायाधीश
प्र.242) राज्यपाल नामनिर्देशित सदस्य किती? 👉 उ. 12
प्र.243) राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात? 👉 उ. उपराष्ट्रपती
प्र.244) केंद्रीय निवडणूक आयुक्त नेमणूक कोण करतो? 👉 उ. राष्ट्रपती
प्र.245) दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे कोण? 👉 उ. डॉ. राजेंद्र प्रसाद
प्र.246) अस्पृश्यता नष्ट करणारे कलम कोणते? 👉 उ. कलम 17
प्र.247) मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी कोणत्या अनुच्छेदानुसार? 👉 उ. अनुच्छेद 75
प्र.248) घटना समितीत कोण नव्हते? 👉 उ. महात्मा गांधी
प्र.249) राष्ट्रीय मानव हक्क आयोग स्थापना वर्ष? 👉 उ. 1993
प्र.250) संविधान सभेचे अध्यक्ष कोण? 👉 उ. डॉ. राजेंद्र प्रसाद
प्र.251) राष्ट्रपती कार्यकाल किती? 👉 उ. 5 वर्षे
प्र.252) राज्यपाल पद रिक्त झाल्यास कोण सांभाळतो? 👉 उ. मुख्य न्यायाधीश
प्र.253) मतदान न करायचे असल्यास पर्याय कोणता? 👉 उ. NOTA
प्र.254) धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाते? 👉 उ. लोकसभा
प्र.255) कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? 👉 उ. मध्यप्रदेश
प्र.256) राज्य लोकसेवा आयोग नेमणूक कोण करतो? 👉 उ. राज्यपाल
प्र.257) कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? 👉 उ. संपत्तीचा हक्क
मित्रांनो, वरील दिलेले GK Questions in Marathi तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आणि चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या तयारीमध्ये मदत होईल.
तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर प्रश्न हवे असतील तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या यशासाठी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. 👍
Also Read









