550+ One liner GK in Marathi | GK Questions in Marathi​ 2026

550+ One liner GK in Marathi | GK Questions in Marathi​ 2026

Spardha Pariksha, शालेय अभ्यास आणि दैनंदिन ज्ञानवृद्धीसाठी One liner GK in Marathi हा आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. कमी वेळेत जास्त माहिती मिळवण्यासाठी एक ओळीतील प्रश्न-उत्तरे (Marathi GK Questions) प्रभावी ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेद्वाऱ्यांसाठी याचा मोठा फायदा होतो.

आजच्या डिजिटल युगात GK Questions in Marathi शोधणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मराठीतून सामान्य ज्ञान मिळाल्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि अभ्यास अधिक सोपा व रंजक बनतो. त्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.

या पोस्टमध्ये तुम्हाला विविध विषयांवरील महत्त्वाचे One liner GK in Marathi प्रश्न मिळणार आहेत. इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी अशा अनेक विषयांचा समावेश करून तुमचे ज्ञान वाढवण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

One liner gk in marathi with answers

One liner gk in marathi with answers
One liner gk in marathi with answers

Q. तानसा, बारवी, मोडकसागर, अपर वैतरणा यापैकी कोणते बरण ठाणे जिल्ह्यात येत नाही?
उत्तर – अपर वैतरणा

Q. नांदेड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत?
उत्तर – 16

Q. नांदेड जिल्ह्यातील प्रसिध्द प्राचीन हेमाडपंथी शिवमंदीर हे कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – देगलूर

Q. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. मांगी तुगी, कळसुबाई, साल्हेर व मुल्हेर, अंजनेरी यापैकी कोणते ठिकाण नाशिक मध्ये नाही?
उत्तर – कळसुबाई

Q. पुरंदर, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?
उत्तर – प्रतापगड

Q. सोलापुर, सातारा, ठाणे, नाशिक वापैकी कोणत्या जिल्ह्याची सिमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही?
उत्तर – नाशिक

Q. जे. एन. पी. टी. पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रायगड

Q. पुणे जिल्ह्यात कित्ती अष्टविनायक मंदिरे आहेत?
उत्तर – 5

Q. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड भिवंडी, वसई, कल्याण, वाडा यापैकी कोणत्या तालुक्यात आहेत?
उत्तर – भिवंडी

Q. यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर – 16

Q. यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – अमरावती

Q. जिल्ह्याची सिमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही?
उत्तर – बुलढाणा

Q. इसापूर प्रकल्प कोणल्या तालुक्यात आहे?
उत्तर – पुसद

Q. सहस्वकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – उमरखेड

Q. राजूर हे ठिकाण कश्तसाठी प्रसिध्द आहे?
उत्तर – दगडी कोळसा

Q. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे?
उत्तर – 11

Q. नागपूर, भंडारा, गोंदिया, सोलापूर यापैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे?
उत्तर – सोलापूर

Q. भिमा नदी कोणत्या जिल्ह्यातुन जात नाही?
उत्तर – सातारा

Q. काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो?
उत्तर – मुंबई

Q. राजगड, अजिंक्यतारा, लोहगड, शिवनेरी यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?
उत्तर – अजिंक्यतारा

Q. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – वर्धा

Q. पिंपरी चिंचवड शहराला या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते.
उत्तर – पवना

Q. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर – मांजरी

Q. परभणी, उस्मानाबाद, सोलापुर, सांगली यापैकी महाराष्ट्राचा कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही?
उत्तर – परभणी

Q. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स जिल्हा आहेत?
उत्तर – 20

Q. साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता?
उत्तर – भूईकोट

Q. कातळशिल्प हे आंबोली, कुंभारमाठ, कुडोपी, फोंडा यापैकी कोणत्या गावामध्ये आढळून येते?
उत्तर – कुडोपी

Q. घारापुरीच्या गुंफा रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात?
उत्तर – रायगड

Q. चाँदबिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
उत्तर – अहमदनगर

Q. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे?
उत्तर – कर्नाटक

Q. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे?
उत्तर – शाहुवाडी

Q. घनसाळ या प्रसिध्य तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते?
उत्तर – आजरा

Q. ‘मौनी विद्यापीठ’ हे शैक्षणिक विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – भुदरगड

Q. पन्हाळागड, भुदरगड, पारगड, लोहगड यापैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही?
उत्तर – लोहगड

Q. नगर जिल्ह्यास लागुन किती जिल्ह्यांची सीमा आहे?
उत्तर – सात

Q. अजिंठा व वेरुळ ही भारतातील प्रसिध्द स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात?
उत्तर – छ. संभाजीनगर

Q. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – संगमनेर

Q. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर – लोह

Q. संग्रामपुर, पिंपळगावराजा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा यापैकी कोणता तालुका बुलढाणा जिल्ह्यातील नाही?
उत्तर – पिंपळगावराजा

Q. सिंदखेडराजा येथे कोणाचा राजवाडा आहे?
उत्तर – लखुजी जाधव

Q. बुलढाणा जिल्ह्यातील कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
उत्तर – बुलढाणा, अंबाबरवा, भिंगारा

Q. ‘व्यवहाराचा काळा घोडा’ हा प्रसिध्द कविता संग्रह कोणत्या कवीने लिहिला?
उत्तर – अजीम नवाज राही

Q. गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?
उत्तर – 03

Q. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सिमा गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेला लागत नाही?
उत्तर – सुकमा

Q. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सिमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही?
उत्तर – वारंगल

Q. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – भामरागड

Q. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे?
उत्तर – छत्रपती संभाजीनगर

Q. नक्षल चळवळीची सुरूवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासुन झाली?
उत्तर – सिरोंचा

Q. गडचिरोली मध्ये सध्या लोहखनिज उत्खनन कोठे सुरू आहे?
उत्तर – सुरजागड

 One Liner GK Questions in Marathi

 One Liner GK Questions in Marathi
One Liner GK Questions in Marathi

Q. गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार, वाशिम यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये येत नाही?
उत्तर – गोंदिया

Q. गडचिरोली मध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे?
उत्तर – नवजीवन

Q. वीर बाबुराव शेडमाके आष्टी, कोरची, किष्टापूर, ग्यारापत्ती यापैकी कोणत्या गावाचे आहेत?
उत्तर – किष्टापूर

Q. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नंदुरबार

Q. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता?
उत्तर – धुळे

Q. गीर, साहिवाल, डांगी, लाल कंधारी यापैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे?
उत्तर – लाल कंधारी

Q. गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – दारव्हा

Q. जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
उत्तर – 952

Q. पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते?
उत्तर – पुष्पवती नगरी

Q. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात?
उत्तर – गोंड, कोलाम, परधान

Q. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर – 09

Q. ‘परभणी क्रांती’ काय आहे?
उत्तर – भेंडीचे प्रकार

Q. परभणी जिल्ह्यात पुर्णा, दुधणा, वैनगंगा, गोदावरी यापैकी कोणती नदी वाहत नाही?
उत्तर – वैनगंगा

Q. परभणी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?
उत्तर – 19

Q. अहमदनगर, जळगाव, नाशिक, सांगली यापैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही?
उत्तर – सांगली

Q. आदिवासीच्या विकासासाठीचा लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या (जनगणना 2011) टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता?
उत्तर – सिंधुदुर्ग

Q. सालेकसा, तिरोडा, गोरेगाव, कारंजा यापैकी कुठला गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही?
उत्तर – कारंजा

Q. सालेकसा, तिरोडा, गोरेगाव, आमगाव यापैकी कोणत्या गावात औष्णिक उर्जा केन्द्र आहे?
उत्तर – तिरोडा

Q. गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर, कारंजा, विरसी, नागरा यापैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे?
उत्तर – बिरसी

Q. गोंदिया जिल्ह्यामध्ये ओडीसी, नागा, तिबेटीयन, आसामी यापैकी कुठल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे?
उत्तर – तिबेटीयन

Q. पवनी गुहा, चांदपुर गुहा, डोंगरगड गुहा, कचारगड गुहा यापैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे?
उत्तर – कचारगड गुहा

Q. फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या दोन जिल्ह्याच्या सिमेवर नक्षल हल्ल्यात दोन पोलीस अंमलदार शहीद झाले?
उत्तर – गोंदिया, राजनंदगाव

One liner gk in marathi

One liner gk in marathi
One liner gk in marathi

Q. 2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती होती?
उत्तर – 253 प्रति चौ.कि.मी.

Q. 2021 मध्ये गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाकडून केलेल्या सारस गणनेमध्ये किती सारस पक्षी जिल्ह्यात आढळून आले होते?
उत्तर – 39

Q. पु.ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, राम गणेश गडकरी, मारुती चितमपल्ली यापैकी कोणते मराठी साहित्यिक हे गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा वनाशी निगडीत आहेत?
उत्तर – मारुती चितमपल्ली

Q. सातारा जिल्ह्यातील ‘खतगुण’ हा गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर – येरळा

Q. सातारा जिल्ह्यामधील बारा मोटीची विहीर कोणत्या गावी आहे?
उत्तर – लिंब

Q. सातारा जिल्ह्यामधील पुसेगाव, दरे, अपशिंगे, बामणोली यापैकी कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्यदलाशी जोडलेले आहे?
उत्तर – अपशिंगे

Q. ‘कोयना धरण’ कोणत्या तालुक्यामध्ये बांधलेले आहे?
उत्तर – पाटण

Q. भीमा, वेण्णा, उरमोडी, तारळी यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही?
उत्तर – भीमा

Q. एलफिस्टन पॉईंट, आर्थरसीट, तापोळा, वजराई धबधबा यापैकी कोणते पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये नाही?
उत्तर – वजराई धबधबा

Q. साताऱ्यामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते?
उत्तर – माण

Q. वसंतगड, वैराटगड, भुषणगड, प्रबळगड यापैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही?
उत्तर – प्रबळगड

Q. सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे?
उत्तर – परळी

Q. हिंदुकुश, आंबा घाट, खंबाटकी यापैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे?
उत्तर – खंबाटकी

Q. माळशेज, बर्म्युडा, भांबवली बजराई, आंबोळी यापैकी सर्वांत उंच धबधबा कोणता आहे?
उत्तर – भांबवली बजराई

Q. उजनी, भाटसागर, धोम-बलकवडी यापैकी कोणते सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहेत?
उत्तर – धोम-बलकवडी

Q. हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे.
उत्तर – खटाव

Q. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो?
उत्तर – नाग नदी

Q. नरनाळा (Narnala) किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे?
उत्तर – अकोट

Q. महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत?
उत्तर – सहा

Q. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले?
उत्तर – धाराशिव

Q. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते?
उत्तर – धरमतर खाडी

Q. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा?
उत्तर – पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री

One liner gk notes in marathi​

One liner gk notes in marathi​
One liner gk notes in marathi​

Q. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता?
उत्तर – आंबेनळी घाट

Q. मांडवा सागरी पोलीस ठाणे, विधी सागरी पोलीस ठाणे, मोरा सागरी पोलीस ठाणे, दादर सागरी पोलीस ठाणे यापैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात येत नाही?
उत्तर – मोरा सागरी पोलीस ठाणे

Q. शारखी, जगबुडी, बाव, कुंडलिका यापैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही?
उत्तर – कुंडलिका

Q. रत्नागिरी जिल्ह्यात बिहू, माडिया नृत्य, नमन यापैकी कोणती लोककला आहे?
उत्तर – नमन

Q. काजू, आंबा, सुपारी यापैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात?
उत्तर – काजू, आंबा, सुपारी

Q. सिंहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी यापैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे?
उत्तर – सुवर्णदुर्ग

Q. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भिमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पालघर

Q. जव्हार, विक्रमगड, घोलवड, तलासरी यापैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात?
उत्तर – जव्हार

Q. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपारिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे?
उत्तर – तारपा

Q. रावणदेव टेकड्या, ब्राम्हणगाव टेकड्या, गिरड टेकड्या, चांदुरगड टेकड्या यापैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही?
उत्तर – चांदुरगड टेकड्या

Q. कवी फ. मु. शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला?
उत्तर – रूपूर

Q. हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
उत्तर – कयाधु

Q. शिरडशहापुर येथील कोणते मंदिर प्रसिद्ध आहे?
उत्तर – दिगंबर जैन मंदिर

Q. गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – सिमेंट

Q. पालघर, नंदुरबार, ठाणे, जळगाव यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही?
उत्तर – नंदुरबार

Q. शहानूर, पेढी, बेंबळा, मोर्णा यापैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही?
उत्तर – मोर्णा

Q. टिपेश्वर अभयारण्य हे बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, अकोला यापैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – यवतमाळ

Q. संजय गांधी नॅशनल पार्क येथे आहे?
उत्तर – मुंबई

Q. महाराष्ट्र राज्याचा पहिला Electronic Manufacturing Cluster कोठे तयार होणार आहे?
उत्तर – पुणे

Q. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन (Jail Tourism) कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे?
उत्तर – येरवडा जेल, पुणे

Q. स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे?
उत्तर – पुणे

Q. ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत?
उत्तर – 6

100 Gk Questions with answers in marathi pdf

Gk Questions with answers in marathi pdf
Gk Questions with answers in marathi pdf

Q. अमरावती जिल्ह्यात अंबादेवी (अमरावती), महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र (रिद्धपुर), संत तुकडोजी महाराजांची समाधी (मोझरी), पुरातन शिवमंदिर (गुफा) (सालबर्डी) यापैकी कोणते ठिकाण नाही?
उत्तर – पुरातन शिवमंदिर (गुफा) – सालबर्डी

Q. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते?
उत्तर – एलिचपूर

Q. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते?
उत्तर – अंजनगाव सुर्जी

Q. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे?
उत्तर – वेळास

Q. NH-3, NH-6, NH-211, NH-8 यापैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात नाही?
उत्तर – NH-8

Q. गोदावरी काठी वसलेली शहरे कोणती?
उत्तर – नाशिक, गंगाखेड, पैठण, नांदेड

Q. सहकारी तत्त्वावर महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला?
उत्तर – अहमदनगर

Q. धापेवाडा या ठिकाणाला विदर्भातील काय म्हणून ओळखतात?
उत्तर – विदर्भातील पंढरपूर

Q. रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
उत्तर – प्रवरा

Q. महाराष्ट्रातील सर्वांत कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता?
उत्तर – मुंबई शहर

Q. भंडारा जिल्हा हा नागपूरच्या कोणत्या दिशेला आहे?
उत्तर – पूर्व

Q. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या दोन लेण्यांचा समावेश वारसा यादीत आहे?
उत्तर – अजिंठा, वेरूळ

Q. सर्वाधिक कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
उत्तर – जळगाव

Q. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सोलापूर

Q. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रायगड

Q. मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात असून ते कोणत्या नदीवर आहे?
उत्तर – ठाणे, वैतरणा नदी

Q. नाशिक व सांगली या दोन जिल्ह्यांना कोणत्या फळांचा जिल्हा म्हणतात?
उत्तर – द्राक्षांचा जिल्हा

Q. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – वर्धा

Q. अमरावती जिल्ह्यात कोणत्या टेकड्या स्थित आहेत?
उत्तर – गाविलगड टेकड्या

Q. महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – स्ट्रॉबेरी

Q. बारवी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – ठाणे

Q. सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे काय म्हणून ओळखतात?
उत्तर – ज्वारीचे कोठार

Q. कळसुबाई हे सर्वाधिक उंचीचे शिखर कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे?
उत्तर – अहमदनगर व नाशिक

Q. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रतिचौरस लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. अनुस्कारा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो?
उत्तर – कोल्हापूर

Q. वाशिम जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते?
उत्तर – वत्सगुल्म

Q. रायगड जिल्ह्यात कोणते बंदर आहे?
उत्तर – नव्हाशेवा (जवाहरलाल नेहरू पोर्ट)

Q. गुहागर तालुक्यात कोणती लेणी आहे?
उत्तर – पन्हाळे काझी लेणी

Q. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांची सीमा लागते?
उत्तर – संगमेश्वर

Q. छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाचे नाव काय?
उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Q. मुंबई येथे कोणते अणु संशोधन केंद्र आहे?
उत्तर – भाभा अणु संशोधन केंद्र

Q. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा

Q. हिंगोली जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे?
उत्तर – औंढा नागनाथ

Q. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. मांढरादेवी हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा

Q. गणपतीपुळे हे धार्मिक व पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रत्नागिरी

Q. जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर – 7612 चौ.कि.मी.

Q. माहुली (सातारा) येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे?
उत्तर – कृष्णा व वेण्णा

Q. मलकापूर व नांदुरा (बुलढाणा) हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतात?
उत्तर – रावेर

Q. फुलंब्री व सिल्लोड हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतात?
उत्तर – जालना

Q. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर – अहमदनगर

Q. कोल्हापूर जिल्ह्यातील बाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – गव्यांसाठी

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर – 8

Q. महाराष्ट्रात 2001-2011 या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ कोणत्या जिल्ह्यात झाली?
उत्तर – ठाणे

Q. कर्नाटक राज्य कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे?
उत्तर – पूर्व

Q. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. लातूर व कोयना येथे अनुक्रमे कोणत्या वर्षी भूकंप झाले?
उत्तर – 1993 व 1967

Q. 2011 च्या जनगणनेनुसार या तीन जिल्ह्यांचा लिंग गुणोत्तर उतरता क्रम काय आहे?
उत्तर – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – गोंदिया

Q. तेलंगणा राज्याला कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे?
उत्तर – नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ

Q. नागपूर शहर कोणी स्थापन केले?
उत्तर – बुलंद शाह

Q. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणती लेणी आहेत?
उत्तर – जोगेश्वरी लेणी

Q. कोयना नदी ही कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते?
उत्तर – कराड (सातारा)

Q. चांदोली अभयारण्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?
उत्तर – सातारा, सांगली, रत्नागिरी

Gk Questions in marathi With Answers

Gk Questions in marathi With Answers
Gk Questions in marathi With Answers

Q. अमरावती जिल्ह्यात कोणता व्याघ्रप्रकल्प आहे?
उत्तर – मेळघाट

Q. चिंचोली औद्योगिक वसाहत कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – होजिअरी

Q. खत उत्पादनाचा उद्योग कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – थळ (वायशेत)

Q. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी (MIA) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. धसई (ठाणे) या गावाची काय म्हणून ओळख आहे?
उत्तर – पहिले कॅशलेस गाव

Q. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे स्थापना वर्ष व जिल्हा कोणता?
उत्तर – 1990, जळगाव

Q. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवीन नाव काय आहे?
उत्तर – बहिणाबाई चौधरी विद्यापीठ

Q. सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव काय आहे?
उत्तर – अहिल्याबाई होळकर विद्यापीठ

Q. पुणे विद्यापीठाचे नवीन नाव काय आहे?
उत्तर – सावित्रीबाई फुले विद्यापीठ

Q. असोलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – चंद्रपूर

Q. गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?
उत्तर – झाडीपट्टी

Q. इगतपुरी येथे कोणते रिसर्च इन्स्टिट्यूट आहे?
उत्तर – विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट

Q. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर – पुणे

Q. चुंबकीय वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अलिबाग (रायगड)

Q. काळाघोडा उत्सव कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो?
उत्तर – मुंबई

Q. डोलोमाइट साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत?
उत्तर – यवतमाळ व रत्नागिरी

Q. ‘होम ऑफ अल्फोन्सो मँगो’ असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते?
उत्तर – रत्नागिरी

Q. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीची सर्वांत मोठी उपनदी कोणती?
उत्तर – कोयना

Q. सर्वाधिक महापालिका असणारा जिल्हा कोणता?
उत्तर – ठाणे

Q. 29वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली?
उत्तर – जालना

Q. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सांगली

Q. लातूर जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत?
उत्तर – खरोसा

Q. कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अलिबाग (रायगड)

Q. गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) हे प्रवेशद्वार कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आले?
उत्तर – राजा जॉर्ज पाचवा व राणी मेरी (1911)

Q. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. बालक्रांतीकारक शिरीषकुमार यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नंदुरबार

Q. कोणत्या जिल्ह्याची अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख आहे?
उत्तर – जळगाव

Q. प्रकाशे (खान्देशची काशी) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नंदुरबार

Q. सखाराम महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – अमळनेर

Q. अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर केला?
उत्तर – प्रतापगड

Q. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मठिकाण कोणते?
उत्तर – देवराष्ट्रे

Q. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – सज्जनगड (सातारा)

Q. राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था (NARI) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – भोसरी (पुणे)

Q. चांगदेवाची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – पुणतांबे (अहमदनगर)

Q. सेनापती बापट यांचे जन्मठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अहमदनगर (पारनेर)

Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले गेले?
उत्तर – फैजपूर (जळगाव)

Q. इंग्रज व मराठे यांच्यातील शेवटची लढाई कोणत्या ठिकाणी झाली?
उत्तर – आष्टी (1818)

Q. खाम नदीच्या काठी कोणता जिल्हा आहे?
उत्तर – छ. संभाजीनगर

Q. कुंडलिका नदीकाठी कोणता जिल्हा वसला आहे?
उत्तर – जालना

Q. संत जनाबाई यांचे समाधी ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गंगाखेड (परभणी)

Q. कयाधू नदीच्या काठी कोणता जिल्हा वसला आहे?
उत्तर – हिंगोली

Q. संत नामदेवांचे जन्मठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नरसी (हिंगोली)

Q. बिंदुसरा नदीकाठी कोणता जिल्हा वसला आहे?
उत्तर – बीड

Q. उस्मानाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते?
उत्तर – धाराशिव

Q. भोगवती नदीच्या काठी कोणता जिल्हा वसला आहे?
उत्तर – धाराशिव

Q. इरई नदीच्या काठी कोणता जिल्हा वसला आहे?
उत्तर – चंद्रपूर

Q. मोर्णा नदीवर कोणता जिल्हा वसला आहे?
उत्तर – अकोला

Q. संत गोरोबा कुंभार यांची समाधी तेरणा येथे असून कोणत्या नदीकाठी आहे?
उत्तर – तेर (तेरणा नदी)

Q. मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – दोडामार्ग

Q. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
उत्तर – रायगड

Q. कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत?
उत्तर – छत्रपती संभाजीनगर विभाग

Q. मराठी विश्वकोष निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
उत्तर – वाई

Q. वाईला काय म्हणून ओळखले जाते?
उत्तर – दक्षिण काशी

Q. गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस कोणता आहे?
उत्तर – 26 ऑगस्ट 1982

Q. गडचिरोली कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो?
उत्तर – नक्षलग्रस्त जिल्हा

Q. कोरणीघाट हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – गोंदिया तालुका

Q. गडचिरोली जिल्ह्यातील ‘मुक्तीपंथ’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?
उत्तर – व्यसनमुक्ती

Q. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
उत्तर – वैनगंगा

Q. गडचिरोली जिल्ह्यात ‘विराज’ राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – वैरागड

Q. चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य कोणत्या नावानेही ओळखले जाते?
उत्तर – प्रशांत धाम

Q. गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे?
उत्तर – पाचवा (14412 चौ.कि.मी.)

Q. पूर्वी ‘भिल्ल ठाणा’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
उत्तर – बुलढाणा

Q. हळदीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
उत्तर – सांगली

Important One Liner GK for Talathi Bharati

Important One Liner GK for Talathi Bharati
Important One Liner GK for Talathi Bharati

Q. ‘नई तालीम’ परिसर कोठे आहे?
उत्तर – सेवाग्राम (वर्धा)

Q. महाराष्ट्रात सर्वांत जास्त कापूस पीकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – यवतमाळ

Q. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अमरावती

Q. वाशिम जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात आहे?
उत्तर – अमरावती

Q. वाशिम जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर – 6

Q. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (J.N.P.T.) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रायगड

Q. रत्नागिरी जिल्ह्यात कोणता अणुऊर्जा प्रकल्प आहे?
उत्तर – जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

Q. कोल्हापूर येथे कोणते विद्यापीठ आहे?
उत्तर – शिवाजी विद्यापीठ

Q. 1 ऑगस्ट 2014 ला कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली?
उत्तर – पालघर

Q. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता?
उत्तर – रत्नागिरी

Q. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते?
उत्तर – खडकवासला

Q. पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर – 14

Q. पुण्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे?
उत्तर – अहमदनगर

Q. पुणे जिल्ह्यातील जलविद्युत केंद्र असणारी ठिकाणे कोणती?
उत्तर – भाटघर, वीर, पानशेत

Q. ठाणे जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत?
उत्तर – 3

Q. ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हा किल्ला कोणी बांधला?
उत्तर – शिलाहार राजा

Q. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नांदेड

Q. बीड जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सरहद्द लागते?
उत्तर – 6

Q. मयुर अभयारण्य बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – नायगाव

Q. बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमीनाबाद म्हणून ओळखले जात होते?
उत्तर – अंबाजोगाई

Q. बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी इ.स. 1763 मध्ये माधवराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला?
उत्तर – राक्षसभूवन

Q. मार्कंडा येथे महाशिवरात्रीची सर्वात मोठी यात्रा कोणत्या जिल्ह्यात भरते?
उत्तर – गडचिरोली

Q. हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांचा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नागपूर

Q. कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
उत्तर – हुपरी

Q. जाखडी हा नृत्यप्रकार कोणत्या जिल्ह्यातील आहे?
उत्तर – रत्नागिरी

Q. जैतापूर खाडीच्या काठी कोणता किल्ला आहे?
उत्तर – यशवंतगड

Q. ठाणे जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान आहे?
उत्तर – वारली

Q. ब्रह्मदेशाच्या चिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रत्नागिरी

Q. नाशिक जिल्ह्यात एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहेत?
उत्तर – 15

Q. अमरावती जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत?
उत्तर – 14

Q. इटियाडोह (गोंदिया) जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर – गाढवी

Q. लोक बिरादरी आदिवासी विकास प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गडचिरोली

Q. भंडारा जिल्ह्यात मैंगनीज खाणी व शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – तुमसर

Q. देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – छ. संभाजीनगर

Q. भंडारा जिल्ह्यातील आंबागड डोंगररांग कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे?
उत्तर – सातपुडा

Q. सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारलेले धरण कोणते?
उत्तर – उजनी

Q. मेळघाट व्याघ्र अभयारण्याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर – ढाकना-कोलकाझ

Q. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कुठे आहे?
उत्तर – रामटेक

Q. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता?
उत्तर – चंद्रपूर

Q. राळेगणसिद्धी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अहमदनगर

Q. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. लोकसंख्या घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता?
उत्तर – गडचिरोली

Q. खापरखेड औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नागपूर

Q. ओझर, जवाहरनगर, वाडी ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत?
उत्तर – संरक्षण साहित्य

Q. कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता?
उत्तर – नाशिक

Q. यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – दगडी कोळसा

Q. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर – ठाणे

Q. धाराशिव शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर – भोगवती

Q. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. काटेपूर्णा नदी वाशिम जिल्ह्यात कुठे उगम पावते?
उत्तर – मालेगाव

Q. आधार कार्ड (UID) प्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटण्यात आले?
उत्तर – नंदुरबार

Q. नागझीरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गोंदिया

Q. ‘ई-ऑफिस’ पूर्णपणे वापरणारा पहिला जिल्हा कोणता?
उत्तर – सिंधुदुर्ग

Q. चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली?
उत्तर – 2012

Q. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर स्थापना वर्ष कोणते?
उत्तर – 1925

Q. नाना पाटील यांनी साताऱ्यात कोणत्या सरकारची स्थापना केली होती?
उत्तर – प्रती सरकार

Q. रंगो बापूजी गुप्ते यांनी सातारामध्ये कोणत्या महाराजांची गादी वाचवण्यासाठी प्रयत्न केले?
उत्तर – प्रतापसिंह महाराज

One liner questions in marathi

One liner questions in marathi
One liner questions in marathi

Q. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त आहे?
उत्तर – गोंदिया

Q. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नागपूर

Q. अकोला जिल्ह्यात कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे?
उत्तर – पारस औष्णिक विद्युत प्रकल्प

Q. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सांगली

Q. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले?
उत्तर – गडचिरोली

Q. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – चंद्रपूर

Q. अमरावती जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
उत्तर – गुगामल

Q. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कोठे आहे?
उत्तर – नागपूर

Q. महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी म्हणून 2010 मध्ये कोणत्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली?
उत्तर – छ. संभाजीनगर

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर – 1 मे 1981

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत?
उत्तर – 8

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ कोठे आहे?
उत्तर – तारकर्ली

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
उत्तर – NH-17

Q. महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणता जिल्हा ‘टुरिझम डिस्ट्रीक्ट’ म्हणून घोषित करण्यात आला?
उत्तर – सिंधुदुर्ग

Q. नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
उत्तर – नाग नदी

Q. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडलेली राज्यातील पहिली जिल्हा परिषद कोणती?
उत्तर – ठाणे

Q. लातूर जिल्ह्यात ‘हत्तीवेट’ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – उदगीर

Q. अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा

Q. कोल्हापूर जिल्ह्यात चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर – कोल्हापूर

Q. सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. ऊस हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड हा वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – गुहागर

Q. गुरु गोविंदसिंग यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नांदेड

Q. ताजमहलची प्रतिकृती म्हणून कोणते ऐतिहासिक ठिकाण ओळखले जाते?
उत्तर – बिबी का मकबरा (छ. संभाजीनगर)

Q. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – मुंबई

Q. अकोला येथील कृषी विद्यापीठ कोणत्या महापुरुषाच्या नावाने ओळखले जाते?
उत्तर – पंजाबराव देशमुख

Q. पितळी भांड्यांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
उत्तर – भंडारा

Q. ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
उत्तर – गोंदिया

Q. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – पवनी

Q. भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
उत्तर – 1 मे 1999

Q. नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे?
उत्तर – पूर्व

Q. येवला (पैठणी साडीसाठी प्रसिद्ध) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. महाराष्ट्रात लढाऊ विमाने बनविण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – ओझर (नाशिक)

Q. चंद्रपूर जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे?
उत्तर – गोंड

Q. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे?
उत्तर – टिपागड

Q. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे?
उत्तर – आंध्रप्रदेश

Q. इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – भंडारा

Important One Liner GK for Police Bharati

Important One Liner GK for Police Bharati
Important One Liner GK for Police Bharati

Q. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अमरावती

Q. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती?
उत्तर – रामप्रधान समिती

Q. अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – चौंडी (अहमदनगर)

Q. नागपूर जिल्ह्यात मिलीट्री ट्रेनिंग स्कूल कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – कामठी

Q. नागपूर विद्यापीठाचे नाव कोणत्या व्यक्तीच्या नावाने ओळखले जाते?
उत्तर – संत तुकडोजी महाराज

Q. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नागपूर

Q. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणाचे नाव काय आहे?
उत्तर – मोडकसागर

Q. ठाणे जिल्ह्याला कोणत्या समुद्राची किनारपट्टी लाभली आहे?
उत्तर – अरबी समुद्र

Q. ओझर (नाशिक) येथे कोणती लढाऊ विमाने तयार होतात?
उत्तर – मिग लढाऊ विमाने

Q. वाशिम जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत?
उत्तर – 6

Q. नागपूरमधील मिहान प्रकल्प उभारणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे?
उत्तर – MADC

Q. ‘प्रभावती’ हे नाव पूर्वी कोणत्या जिल्ह्याचे होते?
उत्तर – परभणी

Q. परभणी महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते?
उत्तर – शालीग्राम वानखेडे

Q. परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध जैन शिल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – जिंतुर

Q. शिल्पग्राम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – सावंतवाडी

Q. विनोबा भावे यांचे जन्मठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रायगड

Q. इरई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – चंद्रपूर

Q. लातूर जिल्ह्याचे विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झाले?
उत्तर – धाराशिव (उस्मानाबाद)

Q. राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 (नवीन क्र. 61) कोणत्या जिल्ह्यातून जातो?
उत्तर – परभणी

Q. भारतात खो-खो खेळाची सुरुवात प्रथम कोठे झाली?
उत्तर – मुंबई

Q. विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात?
उत्तर – अकोला

Q. बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर – 14

Q. महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासींचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नंदुरबार

Q. क्रांतीचौक मैदान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मुंबई

Q. ठाणे जिल्हा कोणत्या विभागात मोडतो?
उत्तर – कोकण

Q. नागपूर जिल्ह्यात मैंगनीज धातूच्या खाणी कोणत्या ठिकाणी आहेत?
उत्तर – सावनेर

Q. मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर – अंबाजोगाई (बीड)

Q. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती?
उत्तर – मुंबई

Q. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे?
उत्तर – सिंधुदुर्ग

Q. बाबा आमटे यांचे ‘आनंदवन’ आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – चंद्रपूर

Q. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर – 15

Q. कार्ला हे प्रसिद्ध गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. महाराष्ट्रातील पहिले डॉल्स म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – डोंबिवली (ठाणे)

Q. सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मोखाडा (पालघर)

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

Q. वसई हा किल्ला कोणी बांधला आहे?
उत्तर – पोर्तुगीज

Q. मुरूड हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रायगड

Q. नाविक वस्तुसंग्रहालय रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – उरण

Q. नानासाहेब करमरकर शिल्प संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – सासवणे (रायगड)

Q. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – गागोदे

Q. समर्थ रामदासांनी ‘दासबोध’ ग्रंथाचे लेखन कोणत्या ठिकाणी केले?
उत्तर – शिवथरघळ (रायगड)

Q. वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – शिरढोण (रायगड)

Q. काष्ठशिल्प संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – कोलाड (रायगड)

Q. भारतरत्न महर्षी कर्वे यांचे जन्मस्थान कोणते?
उत्तर – मुरूड (रत्नागिरी)

Q. परशुराम मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रत्नागिरी

Q. केशवसुतांचे जन्मगाव कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मालगुंड (रत्नागिरी)

Q. स्वामी स्वरूपानंदांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – पावस

Q. राजा शिवाजी सागरी उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मालवण (सिंधुदुर्ग)

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोती तलाव कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – सावंतवाडी

Q. घोडांचा बाजार व चेतक उत्सव नंदुरबारमध्ये कोणत्या ठिकाणी होतो?
उत्तर – सारंगखेडे

Q. तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – जळगाव

Q. संत मुक्ताबाईंची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मुक्ताईनगर (जळगाव)

Q. पाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – जळगाव

Q. म्हसरूळ ही जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नाशिक

Q. गारगोटी खनिज संग्रहालय नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मालेगाव

Q. रणगाडा संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अहमदनगर

Q. चांदबीबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अहमदनगर

Q. दारे नसलेले व लॉकरूम नसलेले देशातील एकमेव पोलीस ठाणे कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – अहमदनगर

Q. कानिफनाथांची जत्रा कोणत्या ठिकाणी भरते?
उत्तर – मढी (अहमदनगर)

Q. शुक्राचार्यांचे भारतातील एकमेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – कोपरगाव बेट (अहमदनगर)

Q. मोरया गोसावींची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – चिंचवड (पुणे)

Q. आय.एन.एस. शिवाजी नौदल प्रशिक्षण स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – लोणावळा (पुणे)

Q. सिद्धेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सोलापूर

Q. गोदावरी गृहनिर्माण प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – कुंभारी (सोलापूर)

Q. कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी कोठे आहे?
उत्तर – सातारा

Q. शंभू महादेव मंदिर सातारा जिल्ह्यात कुठे आहे?
उत्तर – शिखर शिंगणापूर

Q. श्री भवानी चित्र संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – औंध (सातारा)

Q. श्री गोंदवलेकर महाराजांची समाधी कुठे आहे?
उत्तर – गोंदवले (सातारा)

Q. कासचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा

Q. ‘पुस्तकांचे गाव’ भिलार कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा

Q. सांगली कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – नाट्यपंढरी

Q. हरिपूर येथे कृष्णा व वारणा नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सांगली

Q. बत्तीस शिराळे (जिवंत नाग पूजेसाठी प्रसिद्ध) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सांगली

Q. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात कुठे आहे?
उत्तर – देवराष्ट्रे

Q. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सांगली

Q. भालजी पेंढारकर चित्रनगरी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. शालीनी पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – खासबाग (कोल्हापूर)

Q. मराठा सेनापती धनाजी जाधव यांची समाधी कुठे आहे?
उत्तर – वडगाव (कोल्हापूर)

Q. बाहुबली जैन तीर्थस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. सौताडा धबधबा (100 मी.) बीड जिल्ह्यात कुठे आहे?
उत्तर – पाटोदा

Q. उस्मानाबाद जिल्ह्यात किती पोलीस उपविभाग आहेत?
उत्तर – 5

Q. NH-52, NH-65, NH-361, NH-53 यापैकी उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता महामार्ग जात नाही?
उत्तर – NH-53

Q. नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे?
उत्तर – गोंदिया व गडचिरोली

Q. अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – छ. संभाजीनगर

Q. पूर्णा, कुंडलिका, सुखना, भीमा यापैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?
उत्तर – भीमा

Simple GK Questions in Marathi​

Simple GK Questions in Marathi​
Simple GK Questions in Marathi​

Q. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – कोल्हापूर

Q. ‘हर्णे बंदर’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – रत्नागिरी

Q. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर – वर्धा

Q. 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या शहरात आढळला?
उत्तर – पुणे

Q. भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – पुणे

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
उत्तर – आंबोली

Q. रायगड जिल्ह्यात ‘भात संशोधन केंद्र’ कुठे आहे?
उत्तर – कर्जत

Q. ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय’ कोणत्या शहरात आहे?
उत्तर – नागपूर

Q. ऋणमोचन (मुद्गलेश्वर देवस्थान) कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – भातकुली

Q. रुख्मिणीहरणाशी संबंधित घटना अमरावतीमध्ये कुठे घडली असे मानले जाते?
उत्तर – अंबादेवी मंदिर

Q. अमरावतीतील माताखिडकी मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – श्रीकृष्ण

Q. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – वर्धा

Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
उत्तर – नागपूर

Q. भंडारा जिल्ह्याचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे?
उत्तर – 982

Q. मँगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यात कुठे आहे?
उत्तर – तुमसर

Q. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – भंडारा

Q. भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे?
उत्तर – MH 36

Q. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे?
उत्तर – NH 6

Q. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर – 15

Q. रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – भुसावळ

Q. ‘अंबाबारवा अभयारण्य’ बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – संग्रामपूर

Q. बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर – 13

Q. पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?
उत्तर – इंदापूर

Q. माळीण दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात घडली?
उत्तर – आंबेगाव

Q. M.L.A., A.L.P.T., N.L.V., N.E.E.R.I. यापैकी कोणती संस्था पुण्यात नाही?
उत्तर – N.E.E.R.I.

Q. National Film Archive ची मुख्य कचेरी कोठे आहे?
उत्तर – पुणे

Q. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
उत्तर – नंदुरबार

Q. अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
उत्तर – असदगड

Q. अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
उत्तर – यवतमाळ

Q. अकोला जिल्ह्यात किती पोलीस ठाणे आहेत?
उत्तर – 23

Q. अकोला जिल्ह्यातील ‘महान’ धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर – काटेपूर्णा

Q. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?
उत्तर – 1 जुलै 1998

Q. पारस येथील वीज निर्मिती केंद्रात वीज कशापासून तयार होते?
उत्तर – कोळसा

Q. सोलापूर कोणत्या लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – चादरी

Q. देशातील 100% साक्षर जिल्हा कोणता?
उत्तर – एर्नाकुलम

Q. MH-52 नोंदणी क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे?
उत्तर – परभणी

Q. छ. संभाजीनगर जिल्ह्याला पर्यटन राजधानीचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला?
उत्तर – 2010

Q. सातपुडा पर्वतरांगेतील ‘तोरणमाळ पठार’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – नंदुरबार

Q. मराठी विश्वकोष निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – वाई

Q. पाचगणी शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर – जॉन चेसन

Q. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर – अहमदनगर

Q. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
उत्तर – नंदवाळ

Q. दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – राधानगरी

Q. तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – चंदगड

Q. ‘अजिंक्यतारा’ किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – सातारा

Q. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडकसागर) जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर – ठाणे

Q. तुमसर (भंडारा) येथे कशाची मोठी बाजारपेठ आहे?
उत्तर – तांदूळ

Q. नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
उत्तर – 6

Q. श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी प्रसिद्ध आहे?
उत्तर – रोठा

Q. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
उत्तर – मुंबई

Q. ‘फोंडा’ (मधासाठी प्रसिद्ध) सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर – कणकवली

Q. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
उत्तर – 1981

Q. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
उत्तर – मुंबई शहर

Q. महाराष्ट्रात 36 जिल्हे असून ते किती विभागांमध्ये गटबद्ध केले आहेत?
उत्तर – 6

अशा प्रकारचे GK Questions in Marathi नियमितपणे वाचल्यास तुमची स्मरणशक्ती सुधारते आणि परीक्षेत वेगाने उत्तर देण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दररोज थोडा वेळ काढून One liner GK in Marathi सराव करणे खूप फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला अशाच दर्जेदार One liner GK in Marathi आणि GK Questions in Marathi पोस्ट आवडत असतील, तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. ज्ञानाची देवाणघेवाण हीच खरी प्रगती आहे!

Also Read

GK in marathi question with answer

Leave a Comment