Top 50 Important questions in History for MPSC EXAM in Marathi
MPSC परीक्षेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासासंबंधी भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा MPSC परीक्षेची तयारी करत असाल तर आजच्या लेखात दिलेले हे प्रश्न नक्की वाचून जा.
1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी आपल्या …………… या पुस्तिकेत संघाच्या सिद्धान्ताचे विवरण केले आहे.:- वुई
2. जगाच्या इतिहासात सत्याग्रहाचे शस्त्र पहिल्यांदाच वापरले गेले ते दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्या वर्षीं?:- इ. स. १९०६
3. सत्याग्रहाचे वर्णन निष्क्रिय प्रतिकार किंवा… असेही करता येईल.:- सविनय कायदेभंग
4. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनादरम्यान गांधीजींनी तेथील भारतीयांमधील तुरुंगवासाचे भय पूर्णतः नष्ट केले; इतके की लोक तूरंगाला …………… असे संबोधू लागले.:- किंग एडवर्डज हॉटेल
5. ‘पराक्रमी वीर पुरुष व हुतात्मा यांच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्त्व’ या शब्दांत नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी यांचे वर्णन केले आहे.:- महात्मा गांधी
6. “आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनविण्याचे आश्चर्यकारण आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे,” या शब्दांत महात्मा गांधी यांचे वर्णन कोणी केले आहे?:- नामदार गोपाळ कृष्ण गोखले
7. तात्पुरता तह किंवा तात्पुरता समेट या शब्दांत ज्या कराराचे वर्णन केले जाते तो ‘गांधी-आयर्विन करार’ संपन्न झाला………… :- ५ मार्च, १९३१
8. गांधीजीच्या सविनय कायदेभंगाच्या संकल्पनेवर….. यांच्या विचारांची छाप असल्याचे दिसून येते.:- हेन्री थोरो
9. ……………हे गांधीजींचे अपुरे राहिलेले आत्मचरित्र होय.:- माय एक्स्पेरिमेंट्स वुईथ टुथ
10. ३० जानेवारी, १९४८ रोजी गांधीजींची शेवटची मुलाखत घेणारी व्यक्ती ….:- मागरिट बोर्क-व्हाईट
11. ‘मिशन वुईथ माऊंटबॅटन या पुस्तकाचे कर्ते……….. :- कॅम्पवेल जॉन्सन
12. इ. स. १९६० मधील सिंधू पाणी करारानुसार रावी, वियास व सतलज या सिंधूच्या उपनद्यांचे पाणी भारताच्या बाट्याला आले; तर….. नद्यांचे पाणी पाकिस्तानास मिळाले.:- सिंधू, डोलम व चिनाब
13. फेब्रुवारी, १९२७ मध्ये चुसेल्स येथे भरलेल्या साम्राज्य चादविरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोणी केले होते?:-पंडित जवाहरलाल नेहरू
14. इ. स. १९२८ मध्ये ……………या विधेयकावर सरकारचा झालेला पराभव हे स्वराज्यपक्षीयांनी कायदेमंडळात प्रवेश करून मिळविलेले मोठे यश म्हणावे लागेल.:- सार्वजनिक सुरक्षा
15. “खरे क्रांतिकारी सैन्य खेड्यांत आगि कारखान्यांत आढळते,” फाशी जाण्यापूर्वी वा अर्थाचे मत कोणी व्यक्त केले होते?:- भगतसिंग
16. “भांडवलशाही आणि वर्गवर्चस्व यांचा शेवट म्हणजे समाजवाद,” या शब्दांत समाजवादाची व्याख्या करणारा क्रांतिकारक:- भगतसिंग
17. भगवतिचरण वर्मा, चंद्रशेखर आझाद आणि यशपाल बांनी लिहिलेल्या…. या ग्रंथात “सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वातीय म्हणजे क्रांती,” अशी क्रांतीची व्याख्या करण्यात आली आहे.:- ‘फिलॉसॉफी ऑफ दी बॉम्ब’
18. ‘अखिल भारतीय किसान सभा’ कोणी स्थापन केली होती?:- स्वामी श्रद्धानंद
19. ‘कृतीतून शिक्षण’ या उद्देशाने गांधीजीनी…. ही शिक्षण योजरा मांडली.:- वर्धा योजना
20. इ. स. १९६२-६३ मधील काँग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेऊन सरकारमधील काँग्रेस नेत्यांनी अधिकारपदे सोडून जनतेत जाऊन कार्य करावे व पक्षाची प्रतिमा उजळ करावी, अशा अर्थाची एक योजना आखली गेली होती. ती योजना तिच्या निर्मात्याच्या नावानुसार…… म्हणून ओळखली जाते?:- कामराज योजना
21. …… यांनी इ. स. १९८३ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या अलिप्त राष्ट्र चळवळीचे अध्यक्षपद भूषविले होते.:- इंदिरा गांधी
22. इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. इ. स….. पर्यंत सुरत हे ब्रिटिशांचे भारतातील व्यापारी केंद्र होते.:- १६८७
23. फ्रेंचांनी भारतातील आपली वसाहत पंडिचरी (पुदुच्चेरी) येथे स्थापन केली. पुढे सन…. पर्यंत पडियारी (पुदुच्चेरी) फ्रेंचांच्या अमलाखाली राहिले. :- १९५१
24. २३ जून, १७५७ रोजी भारतातील मध्य युगाचा अस्त होऊन अर्वाचीन युगाचा प्रारंभ झाला.” हे उद्गार कोणाने ?:- सर जदुनाथ सरकार
25. “इतकी भ्रष्ट राजवट जगाच्या पाठीवर कोठेही झाली नसेल, रॉबर्ट क्लाईव्हच्या बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्थेच्या संदर्भात हे उद्गार काढले……………:- सर जॉर्ज कॉर्नवॉल
26. “पक्क्या मालाची मक्तेदारी इंग्लंडकडे आणि कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा करण्याची जबाबदारी भारतावर.” ही इंग्रज अर्थनीती खच्या अधनि याच्याच काळात सुरू झाली…………… :- रॉबर्ट काठाईव्ह
27. “दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून क्लाईव्हने दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले.” असे कोणी म्हटले?:- सरदार पण्णीकर
28. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने इंग्लंडचा पंतप्रधान विल्यम पिट्ट याने ‘इंडिया ऍक्ट’ संमत करून घेतला …………… :- ९ ऑगस्ट, १७८४
29. “दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन.” असे कोण म्हणत असे?:- टिपू सुलतान
30. तिसरे व शेवटचे इंग्रज-मराठा युद्ध १८१७-१८ मध्ये लढले गेले. या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा सपशेल पराभव झाला. या वेळी इंग्रजांचा गव्हर्नर जनरल होता:- माक्विंस ऑफ हेस्टिंग्ज
31. “Wellesley converted the British Empire in India into the British Empire of India.” या मोजक्या शब्दांत वेलस्लीच्या भारतातील कामगिरीचे मूल्यमापन केले:- सिडने-जे-ओवेन
32. प्रारंभी भारतातील आपली राजवट इंग्रजांनी ‘दिल्लीच्या बादशहाच्या’ नावानेच राबविली; परंतु …. याच्या काळात मात्र केवळ नाममात्र असलेला हा उल्लेख टाळून कंपनीचे राज्य सार्वभौम असल्याचे सूचित केले गेले.:- माक्विंस ऑफ हेस्टिंग्ज
33. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व सतलजपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत ब्रिटिशांचे साम्राज्य याच्याच काळात प्रस्थापित झाले …. :- माक्विंस ऑफ हेस्टिंग्ज
34. सन १८५७ च्या उठावाची पहिली ठिणगी बराकपूरच्या छावणीत पडली होती. याच ठिकाणी १८५७ पूर्वीही हिंदी शिपायांनी उठावाचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. कोणत्या वर्षी?:- इ. स. १८२५
35. मध्य प्रदेश, राजपुताना आदी भागांत असलेली लहान बालिकांना ठार करण्याची प्रथा कायदा करून लॉर्ड बेटिंकने बंद पाडली. बेंटिकच्या कारकिर्दीत.. या अधिकाऱ्याने काही रानटी जमातींमध्ये असलेली नरबळीची प्रथाही संपुष्टात आणली:- कर्नल कॅम्पबेल
36. ‘बराकपूर’ हे ठिकाण सध्याच्या…. या राज्यात येते.:- पश्चिम बंगाल
37. “If the “Sindhia’ joins the Mutiny I shall have to pack off tomorrow.” हे उद्गार कोणी काढले होते ?:- लॉर्ड कॅनिंग
38. “Although a lady, she was the bravest and be military leader of the rebels a scen among the mutineers.” झाशीच्या राणीविषयी हे प्रशंसोद्गार काढले आहेत…. या इंग्रज अधिकाऱ्याने :- सर ह्यू रोज
39. इस्लाम धर्मतत्त्वात गुलामगिरीला थारा नाही, हे स्पष्ट करून देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘वहाबी’ चळवळीचे प्रणेते म्हणजे ……… :- सर सय्यद अहमदखान
40. सन १८८५ मध्ये राष्ट्रसभेची स्थापना होण्यापूर्वी हिंदी जनतेत राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणण्यासाठी सन १८८४ मध्ये ‘इंडियन नॅशनल युनियन’ची स्थापना केली. :- सर अॅलन ह्यूम
41. ‘कोलकाता ते अलाहाबाद (सध्याचे नाव प्रयागराज)” हा लोहमार्ग …. या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.:- लॉर्ड कॅनिंग
42. लॉर्ड लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे ‘अ बोल्ट फ्रॉम दी ब्ल्यू’ (अचानक आणि अनपेक्षित) या शब्दांत वर्णन केले:- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
43. ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस ‘कैसर-ए-हिंद’ ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?:- दिल्ली
44. देशी वृत्तपत्र कायद्याप्रमाणेच सन १८७८ मध्येच संमत केलेल्या या दुसऱ्या कायद्यामुळेही लॉर्ड लिटन भारतीयांमध्ये अप्रिय झाला.:- शस्त्रबंदी कायदा
45. लॉर्ड लिटननंतर अधिकारपदावर आलेल्या…. या उदारमतवादी व्हाइसरॉयने भारतीय जनतेस उद्देशून “Judge me by my acts and not by my words.” असे उद्गार काढले होते.:- लॉर्ड रिपन
46. “हिंदी लोक माथेफिरू व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ब्रिटिश राज्यघटनेतील स्वातंत्र्याचे हक्क उपभोगण्यास ते पात्र नाहीत.” असे उद्गार काढणारा भारतमंत्री…………:- लॉर्ड जॉन हॅमिल्टन
47. भारतीय लोक, त्यांचा इतिहास व त्यांची संस्कृती यांवर प्रेम करणारा व प्राचीन भारताच्या वैभवशाली संस्कृतीच्या खुणा जपण्यासाठी सन १९०४ मध्ये ‘प्राचीन स्मारक कायदा संमत करणारा …. हा व्हाइसरॉय प्रत्यक्षात मात्र भारतीय जनतेत कमालीचा अप्रिय ठरला.:- लॉर्ड कर्झन
48. “Like James II of England Curzon knew the art of making enemies.” या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले.: ग्रोव्हर व सेठी
49. ‘भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ’ असे कोण म्हणत असे?: लॉर्ड कर्झन
50. लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून …. याने लष्कर अधिक सुसज्ज केले.:- लॉर्ड किचनेर
तुम्हाला वरील प्रश्नांसंबंधी काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.
Also Read









