शुंग, सातवाहन व कुशाण घराण्याची माहिती | Shunga, Satavahana and Kushan Information in Marathi
शुंग घराणे
पुष्यमित्र शुंग हा या घराण्याचा संस्थापक होष. त्याने शेवटबा मौर्य राजा बृहद्रबासमान त्याचे राज्य बाळकाविले. पुष्यमित्र हा बृहद्राचा सेनापती होता. पुष्यमित्राने मीयांचे राज्य अशा प्रकारे काबीज केले तरी मौर्य साम्राज्याचा सर्वच प्रदेश मात्र तो उपल्या नियंत्रणाखाली आणू शकला नाही. गुंग हे भारद्वाजगोत्री ब्राह्मण होते. पुष्यामिशच्या कारकिर्दीत त्याचा मुलगा अग्निमित्र पाने विदर्भाचा राजा यज्ञसेन याचा युद्धात पराभव केला. तसेच या काळात बंक्ट्रियाचा ग्रीक राजा डिमिट्रिक्स याने भारतावर स्वारी करून भारताचा फार मोठा प्रदेश जिंकला पण पुष्यमित्राने त्याच्या सैन्याचा पराभव करून पंजाबपर्यंतचा प्रदेश परत मिळविला.
पुष्यमित्राने ३६ वर्षे (इ.स.पू. १८७ ते इ.स.पू. १५१) राज्य केले. त्याच्या कालात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले. त्याने दोन वेळा आचमे यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर अग्निमित्र, सुन्येष्ठ, वसुमित्र इत्यादी राजे या मराण्यात झाले. पुराणातील उल्लेखानुसार गुंग घराण्यात एकंदर दहा राजे होऊन गेले. गुंगांचा शेवटचा राजा देवभूती याची, त्याचा ब्राह्मण मंत्री वसुदेव कण्व याने हत्या केली आणि सत्ता बळकाविली अशा रीतीने इतिहासाची पुसावृत्ती होऊन शुंगांच्या जागी क पराणे सरोम आले.
गुंग काळाचे महत्त्व
(१) मुंगांनी परकीयांची म्हणजे ग्रीकांची आक्रमणे परतवून लावली.
(२) या कालात नैदिक धर्माला कन्याने महत्व प्राप्त झाले. शुगानी पज्ञासारख्या वैदिक प्रथा पुन्हा चालू केल्या
(३) त्यांच्या काळात संस्कृत साहित्याचा बराच विकास
(४) शुंग राजांनी आपल्या राज्यात कलेलाही उत्तेजन दिले, बारहट बेबील स्तूप तसेच बेसनगरचा गरुडस्तंभ याच काळातील होत. शुंगांनंतर आलेल्या कण्च पराण्याची सत्ता सुमारे ४५ वर्षे टिकून राहिली.
सातवाहन घराणे
सातवाहन घराणे हे दक्षिण भारतातील एक प्रमुख घराणे होते. पुराणात सातवाहनांना ‘आंध्र’ असेही महटले आहे. सातवाहनांच्या कालखंडाबद्दल इतिहासकारांत बरेच मतभेद आहेत. काही इतिहासकार हा कालखंड इ. स. पू. २३५ ते इ. स. २२५ असा मानतात तर काही इतिहासकार ह कालखंड इ. स. पू. ३७ ते इ. स. २२५ असा मानतात.
सातवाहनांच्या इतिहासाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्यांच्या कारकिर्दीबद्दल बरीच संदिग्धत राहून गेली आहे. सातवाहनांबद्दल पुराणांतून मिळणारी माहिती परस्परविरोधी असल्याने विश्वसनीय वाटत नाही. मत्स्य व ब्रह्मांड पुराणात सातवाहनांची सत्ता ४५० वर्षे चालली व या काळात ३० राजे होऊन गेले असा उल्लेख आहे. याउलट विष्णुपुराणात ही सत्ता ३०० वर्षे टिकल्याची व १९ राजे होऊन गेल्याची माहिती मिळते. या परीण्याचा संस्थापक सिमुक हा होता. त्याच्यानंता त्याचा भाऊ कृष्ण सलेवर आला; पण या घराण्यातील पहिला महत्वाचा राजा श्रीगातकर्णी पहिला हा होय. त्याने देवी नामनिका या महारठी राजकन्येशी विवाह करून महाराष्ट्रात आपली सत्ता बळकट केली.
श्रीशातकर्णनि दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ करून वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन केले. त्याने ‘अप्रतिहतंचक्र व ‘दक्षिणापथपंती’ ही बिरुदे धारण केली होती.
श्रीशातकर्णी पहिला याच्यानंतर शातकर्णी दुसरा. हाल, गौतमीपुत्र श्रीशातकणी, पुलुमाची दुसरा (बासिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुलुमाची) वासिष्ठीपुत्र श्रीमातकर्णी, शिवश्री पुलुमानी, यज्ञत्री शातकर्णी, वासिष्ठीपुत्र श्रीचंद्र शातकर्णी इत्यादी अनेक राजे या घराण्यात होऊन गेले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतब्धत सातवाहनांची सत्ता संपुष्टात आली.
महाराष्ट्रातील प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) हे सात कहनांच्या राजधानीचे शहर होते. गौतमीपुत्र श्रीशातकर्णी हा या घराण्यातील महत्वाचा राला होच, सातवाहनांमधील तो सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. तो अतिशय शूर व पराक्रमी योद्धा होता. त्याने माळव्यापासून कर्नाटकापर्यतचा सर्व प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला होता.
गौतमीपुत्राने शक, पहलय, शहरात इत्यादी राज्य-कल्यांचा पराभव करून सातवाहनांचा दबदबा वाढविला. यास “त्रिसमुद्रतीयपीतवाहन” म्हणजे ‘ज्याचे घोडे तीनही समुद्रचेि पाणी प्यायले आहेत असा, असे म्हटले जात होते. यो प्रजाहितदक्ष प सहिष्यू राजा म्हणूनही ओळखला जातो.
सातवाहन काळाचे महत्त्व
(१) सातवाहनांनी दक्षिण भारतात प्रथमच एक बलाकध व राजकीयदृष्ट्या प्रभावी सत्ता उभी केली.
(२) सातवाहन राजे वैदिक धर्माचे अभिमानी होते. त्यामुळे त्यांच्या काळात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले, यज्ञयागां-सारख्या प्रथांना महत्व दिले जाऊ लागले.
(३) सातवाहन राजे वैदिक धर्माचे अभिमानी असले तरी त्यांनी बौद्ध धर्मालाही संरक्षण व उत्तेजन दिले होते. त्यांच्याच कारकीर्दीत अजिंठा, वेरुळ, काले, भाने, नाशिक इत्यादी ठिकाणी डोंगरात चैत्यगृहे, विहार व लेगी खोदण्यात आली.
(४) या काळात वैष्णव व पंथांच्या प्रसारास सुरुवात झाली.
(५) या काळात कलेच्या क्षेत्रात बरीच प्रगती झाली. त्याचा दृश्य पुरावा म्हणजे महाराष्ट्रात ठिकठिकाणी डोंगरात कोरलेली लेणी व बिहार हा होय.
(६) सातवाहन राजा हाल याने प्राकृत भाषेत ‘गाथासप्त-शती’ नावाचा ग्रंथ लिहिला. सातवाहनांचा प्रधान गुणाख्य बाने पैशाविक भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला. काही संस्कृत साहित्याचीही या काळात निर्मिती झाली.
कुशाण घराणे
भारतावर ज्या परकीयांनी आक्रमणे केली; पण भारतात आल्यावर ने भारतीय सस्कृतीशी पूर्णपण एकरूप झाले, अशा परकीयापैकी कुशाण हे एक होते. कुशाण मूळचे ‘युएची’ नावाच्या भटक्या टोळीचे लोक होते. या युएची टोक्या चीनच्या वायव्येकडील प्रदेशात राहत होत्या; परंतु हुग टोक्यांनी त्यांना तेथून हाकलून लावले. त्यामुळे युएची टोळीवाले पश्चिमेकडे सरकले आणि त्या ठिकाणच्या शकांना त्यांनी हुसकावून दिले. त्यानंतर याही प्रदेशातून युएबींना हुणांनी हाकलून लावले. त्यावर पुन्हा एकदा युएची लोकांनी शकांच्या प्रदेशात घुसून त्यांचा पराभव केला. तेथे (बैक्ट्रिया) त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. या युएची टोळीवाल्यांपैकीच कुशाण हे एक होत.
पहिला कंडफिसस
कुशाण घराण्यातील पहिला महत्त्वाचा राजा पहिला कंडफिसस हा होय. त्याला कुन्जुल केंडफिसस असेही म्हणतात. त्याने युएचींना कुशाणांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आणले. त्याने पहलय व ग्रीकांचा पराभव करून अफगाणिस्तारपासून सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
दुसरा कॅडफिसम
वाला विम कॅडफिसस असेही म्हणतात, त्याने आपली सत्ता बनारसपर्यंत वाढवून कुशाण साम्राज्याचा विस्तार केला, तो शिवभक्त होता, त्याच्या नाण्यांवर शिवमुद्रा कोरलेली होती. त्याने सोन्याची नाणी पाडली होती.
कनिष्क
हा कुसाण घराण्यातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता होता. तो एक पराक्रमी योद्धा, उत्कृष्ट प्रशासक, आदर्श राज्यकर्ता व बौद्ध धर्माचा अनुयायी होता. कनिष्काने आपला राज्यविस्तार गांधारपासून पाठली-पुत्रापर्यंत केला होता. ‘पुरुष’ ही त्याच्या राज्याची राजधानी होती. कनिष्काने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बरेच प्रयत्न केले. त्याने आपल्या काळात काश्मीरमधील कुंडलवन ने एक बौद्ध धर्मपरिषदही भरविली होती. इ. स. ७२ मध्ये संपल झालेली ही परिषद बौद्धांची चौथी धर्मपरिषद होय, धार्मिक बाबतीत तो सहिष्णू वृत्तीचा होता.
कनिष्काने इ. स. ७८ मध्ये ‘शक’ कालगणनेस मुरुवात केली. कनिष्काने आपल्या राज्यात विद्वानांना उदार आश्रय दिला. प्रसिद्ध लेखक अश्वघोष, वसुमित्र, तत्त्ववेत्ता, नागार्जुन, वैद्य चरक यांसारखे विद्वान त्याच्या दरबारी होते. वसुमित्र व अश्वघोष बीद्ध धर्मीयांच्या चौथ्या धर्मपरिषदेत अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष होते. कनिष्काने अनेक स्तूप, बिहार व चैत्यगृहे उभारली. त्याने अनेक कलाकारांनाही आश्रय दिला.
कनिष्कानंतर बशिष्क, हविष्क, पहिला वासुदेव इत्यादी राजे कुजाण घराण्यात होऊन गेले. पहिल्या बासुदेबानंतर कुशाण साम्राज्याला उतरती कळा लागली. कुशाणांच्या काळात बौद्ध धर्मातील महायान पंथाचा विकास झाला. भारतीय संस्कृतीचा मध्य व पूर्व आशियात प्रसार करण्यात कुशाण राजांनी हातभार लावला, तसेच त्यांनी आपल्या राज्यात शांतता व सुबत्ताही आणली.









