मौर्य साम्राज्य संपूर्ण माहिती मराठी मध्ये । Morya Samarjya Information in Marathi 2025

मौर्य साम्राज्य संपूर्ण माहिती मराठी मध्ये । Morya Samarjya Information in Marathi

मौर्य साम्राज्याच्या स्थापनेमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर राजकीय ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली. मौर्य साम्राज्य हे भारतातील फार मोठ्या प्रदेशावर पसरलेले पहिलेच साम्राज्य होते. आजच्या या लेखामध्ये आपण मौर्य समाजाबद्दल च महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

मौर्य साम्राज्याच्या उदयानंतर विश्वसनीय स्वरूपातील भारताचा इतिहास उपलब्ध झाला. अनेक विश्वसनीय अशा पुराव्यांच्या आधारे भारतीय इतिहासाला विश्वसनीयता प्राप्त आली. या कालखंडानंतर भारतीय इतिहासात निश्चित अशा वारसखा उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे निरनिराळी राजघराणी व राज्यकर्ते यांचे कालखंड निश्चित ठरविता येऊ लागले.

मोर्यांच्या इतिहासाची साधने

मौर्यकालाच्या अभ्यासाची अनेक साधने उपलब्ध आहेत. बौटिल्याचे अर्थशास्व स्थिनिया अथ किमनस या मौक बनिलाहया नोंदी, अशोकाचे शिलालेख, हिंदू पुरणी बौद्ध क और वात्मद यांद्वारे आपणास मोकलची भरपूर माहिती मिळते.

चंद्रगुप्त मौर्य

चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होय. त्याच्या कुळाविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली गेली आहेत. विष्णुपुराणात असा उल्लेख आहे की नंदाच्या रासवाच्या दासीपासून झालेता वो पुत्र होता; पण बौद्ध अथात तो क्षत्रिय असल्याया उल्लेख सापडतो. चंद्रगुप्ताने मगधाच्या धनानंद (सर्वार्थसिद्धी) नावाच्या नंदराजाचा पराभव करून मगधाचे राज्य जिंकून घेतले (इ. स. पू. ३२२), त्याला या कामी चाणक्य नावाच्या ब्राह्मणाचे साहाय्य लाभले. चाणक्याचा नंदराजाने अपमान केला होता. त्यामुळे नंदाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा चाणक्याने केली. पुढे चंद्रगुप्त व चागनय एकत्र येऊन त्यांनी नंदाचा पराभव केला.

चंद्रगुप्ताचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्याने ग्रीकांच्या ताब्यातील भारतीय प्रदेश ग्रीकांकडून जिंकून घेतला. त्याने ग्रीकांचा सेनापती दुडेमॉसचा पराभव करून त्याला भारताबाहेर हाकलून लावले. ग्रीकांचा आगढ़ी एक सेनापती सेल्युकनाने भारतावर स्वारी केली तेव्हा चंद्रगुप्ताने त्याचाही पराभव केला (इ.स. पू. ३०५). सेल्यूकसने ग्रीक साम्राज्याचा काही प्रदेश चंद्रगुप्ताला दिला, तसेच आपली मुलगी हेलेन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह लावून दिला.

याशिवाय चंद्रगुप्ताने सौराष्ट्र, विदर्भ, महाराष्ट्र इत्यादी प्रदेशही काबीज केले, दक्षिणेत मौसूरपर्यंत त्याच्या सैन्याने मुसंडी मारली होती, अशा रीतीने भारताचा फार मोठा प्रदेश त्याने आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. उत्तर भारतावर तर त्याने निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले होते.

बिंदुसार

चंद्रगुप्तानंतर त्याच्चा मुलगा बिंदुसार हा सत्त्यावर आला. त्याचा कालखंड इ.स.पू. २९८ ते इ.स.पू. २७३ असा मानला जातो. त्याला ‘अमिश्यात’ म्हणजे राजूचा नाश करणारा असे म्हटले जाते. बिंदुसाराच्या कारकिर्दीविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. बिंदुसाराने ग्रीकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते. त्याच्या दरबारी डिमेकस हा ग्रीक वकील होता. त्याच्या कारकिर्दीत तक्षशिला येथे उठाव झाला असताना त्याने आपला मुलगा अशोक याला तेथे पाठवून को उठाव मोडून काढला.

अशोक

बिंदुसाराला अनेक पुत्र होते. स्थापैकी अशोक याने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर बिंदुसाराची गादी काबीज केली; पण तो गादीवर आल्यानंतर चार वर्षांनी त्याचा राज्याभिषेक झाला. याचा कालखंड इ.स.पू. २०७३.स. ५.२३२ असा मानला जातो. अशोकाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण घटना माणने त्याचा कलिग देशावरील बिजय होय. इ. स. पू. २६१ मध्ये अशोकाने प्रचंड सैन्यानिशी कलिंगावर स्वारी करून ते राज्य जिंकून घेतले. या युद्धात प्रचंड प्रमाणावर रक्तपात झाला, अशोकाला त्याचा खूप पश्चात्ताप झाला आणि बुद्ध व हिंसा या मागांपासून परावृत्त होण्याचा त्याने निश्चय केला.

पश्चात्तापदग्ध अशोक अहिंसा व शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माकडे वळला. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्या धर्माच्या प्रचारकार्यास स्वतःस बाहून घेतले. त्यासाठी अशोकाने देशाच्या निरनिराळ्या भागांत धर्मप्रसारक पाठविले, बौद्ध धर्म हा राज्याचा अधिकृत धर्म बनविला. अशोकाने आपल्या कारकिर्दीत (इ. स. पू. २४० च्या सुमारास) बौद्धधर्मीयांची तिसरी धर्मपरिषद पाटलीपुत्र येथे भाविली होती. अर्थात, त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारावर भर दिला असला तरी धार्मिक बाबतीत सहिष्णुतेचेच धोरण स्वीकारले होते.

अशोकाने स्वतःचे आचरणही अतिशय शुद्ध ठेवले होते. बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला. अशोकाने राज्यात पशुहत्येस आळा घालण्याचा प्रयत्न केला. राज्यात ठिकठिकाणी धर्मशाळा, दवाखाने, बिहार, अप्रछते उपडली. त्याने आपल्या प्रजेच्या हिताकडे सतत लक्ष पुरविले. अशोकाने आपल्या राज्यात ठिकठिकाणी शिलालेख छ स्तंभालेख कोरून ठेवले. धर्मतत्त्वांचा प्रसार हा त्यामागील त्याचा उद्देश असला तरी त्या शिलालेखांहून त्याचा राज्यकारभार व त्याची प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ याचीही माहिती आपणास मिळू शकते.

अशोकानंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. त्याच्यानंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे कमकुवत होते. ज्यांच्याकडे कर्तबगारीया अंधा होता. स्यामुळे एख्या विशाल साम्राज्याचा कारभार त्याना समर्थपणे चालविता आला नाही. साहजिकच अशोकानंतर सुमारे ५० वर्षांतच मौर्य साम्राज्याचा विनाश झाला. शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याचा, त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग बाने खून करविला आणि स्वतःच गादी बळकाविली.

मौर्याचे प्रशासन

(१) चंद्रगुप्त मौर्य, बिदुसार व अशोक या तीन सम्राटांनी आपल्या साम्राज्याच्या प्रशासनाची घड़ी व्यवस्थित बसविली होती. राज्याची सर्व सत्ता राजाच्या हाती केंद्रित झाली होती; पण राजा अनियंत्रित सत्ताधीश बनला नव्हता.

(२) राजाला राज्यकारभारास मदत करण्यासाठी मंत्री, अमात्य इत्यादी अधिकान्यांची नियुक्ती केलेली असे. राज्यकारभाराच्या सोयीसाठी विविध खाती निर्माण केलेली होती व प्रत्येक खात्याची जबाबदारी विशिष्ट अधिका-यांवर सोपविली होती.

(३) राज्याचे निरनिराळे प्रादेशिक विभागही पाडण्यात आले होते. राज्यात गुप्तहेर खाते हा एक महत्त्वाचा विभाग निर्माण करण्यात आला होता.

(४) न्यायदानासाठी दोन प्रकारची न्यायालये स्थापन करण्यात आली होती. ती म्हणजे (१) धर्मस्थीय व (२) कंटकशोधन.

अर्थव्यवस्था

मौर्य काळात राज्याची अर्थव्यवस्था शेतीप्रधान होती. त्यामुळे जमीनमहसूल ही राज्याच्या अपत्राची मुख्य बाब उरली होती. याशिवाय वस्तूच्या खरेदी-विक्रीवरील कर, जकात, जंगले व सरकारी जमिनीचे उत्पन्न व्यवसायावरील कर इत्यादी गोष्टीपासूनही राज्याला उत्पन्न मिळत असे. हा पैसा राज्याचे प्रशासन, सैन्य व लोकोपयोगी कामे बांवर खर्च केला जात असे.

समाजव्यवस्था

मौर्य काळात समाजरचना चातुर्वर्ण्य पद्धतीवरच आधारित होती. विवाह बहुतांशी स्वजातीतच हीत असत. बहुपानी कत्याची तसेब हंड्याची प्रथा रुथ होती. राज्यातील प्रमुख धर्म वैदिक, बौद्ध में जैन हे होते. अशोकाच्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला.

कला व विद्या

कला व विद्येच्या क्षेत्रातही मौर्य काळात चांगली प्रगती झाली होती. मौर्य काळात संस्कृत व पाली या दोन भाषा ता ब्राह्मी व खरोष्टी या दोन लिपी प्रचलित होत्या. स्थापत्य व शिल्प या कलेच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अग्ली होती. भारतातील पहिली लेणी या काळात कोरण्यात आली होती. अशोकाने अनेक साप, बिहार व चैत्यगृहे उभारली होती.

मित्रांनो मला अशा आहे Morya Samarjya Information in Marathi या लेखाद्वारे तुम्हाला मौर्य सामाज्याबद्दल जाणून घायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट मध्ये विचारा किंव्हा contact.technovision@gmail.com या ई-मेल आयडी द्वारे माझ्याशी संपर्क साधा.

Leave a Comment