मध्ययुगीन भारताचा इतिहास | History of Medieval India in Marathi
दिल्ली सल्तनत
भारतीय इतिहासातील इ. स. १२०६ ते १५२६ हा कालखंड दिल्ली सल्तनतीचा (सुलतानशाहीचा) कालखंड म्हणून ओळखला जातो. सुलतानशाहीच्या या कालखंडात पाच मुस्लीम घराण्यांनी दिल्लीच्या तख्तावर आली सत्ता गाजविली, ही पाच पराणी म्हणजे- गुलाम घराणे, खिलजी पराणे, तुचलक घराणे, सय्यद घराणे व लोदी घराणे.
अर्थात, या घराण्यांचा इतिहास म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास नव्हे. कारण, वरील कालखंडात देशाच्या इतर भागांत निरनिराळ्या सत्ता अस्तित्वात होत्या आणि त्या सुलतानशाहीच्या नियंत्रणापासून मुक्त होत्या. इसवी सनाच्या आठव्या शतकापासूनच भारतावर मुसलमानी आक्रमणे होऊ लागली होती. इ. स. ७९२ मध्ये मुहंमद बिन कासीम बाने सिंधवर आक्रमण करून सिपचा राजा दाहीर बाचा पराभव केला. पुढे गझनीचा मुहंमद याने तर तीस वर्षांत भारताबर एकूण सतरा स्वाऱ्या केल्या, त्यानंतर मुहंमद घोरीने १९९९ मध्ये भारतावर स्वारी केली. या वेळी पृथ्वीराज चौहान बाने त्यास पराभूत केले; पण पुढच्याच वर्षी घोरीने पुन्हा आक्रमण करून पृथ्वीराज चौहानचा पराभव केला आणि दिल्लीवर आपली सत्ता प्रस्थापित केली.
गुलाम घराणे (इ. स. १२०६-१२९०) कुतुबुद्दीन ऐबक
कुतुबुद्दीन ऐबक (इ. स. १२०६-१०) हा गुलाम घराण्याचा संस्थापक होय. तो मुहंमद चोरी याच्याकडे गुलाम होता; पण त्याची कर्तबगारी पाहून मुहंमद मौरीने त्याच्यावर भारतीय प्रदेशाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपविली. मुहमद बोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन भारतातील पहिला मुस्लीम राज्यकर्ता बनला दिल्लीची सत्ता हातो आल्यावर दिल्लीच्या आसपासचा आणखी काही प्रदेश विकून घेऊन त्याने आपले राज्य वाढविले.
नंतरचे सुलतान
या घराण्यातील इतर राज्यकर्ते असे आरामशहा (१२१०-११), इल्तुतमिश (१२११-३६), रुक्नुद्दीन फिरोजशहा (१२३६), रझिया सुलताना (१२३६-४०), मुश्मुद्दीन बेहरामशहा (१२४०-४२), अल्लाउद्दीन मसूदशहा (१२४२-४६), नासिस्दीन महंमद (१२४६-६६), गियासुद्दीन बल्बन (१२६६-८६), कैलुबाद (१२८७-९०), समसुद्दीन इल्तुतमिश हा गुलाम घराण्याचा सर्वश्रेष्ठः सुलतान होय, असे डॉ. मुजुमदार म्हणतात, त्याने आपल्या शत्रूचा पाडाव करून स्वतःची व गुलाम घराण्याची सत्ता बळकट केली. तो एक कर्तबगार राज्यकर्ता होता. याच्याच काळात दिल्लीचा कुतुबमिनार बांधून पूर्ण झाला.
रझिया सुलताना ही दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली व अखेरची मुस्लीम राज्यक्ती ठरली. ती अतिशय कर्तबगार आणि राजनीतिकुशल स्वी होती; पण एक सहरी राज्यकर्ती बनावी, हे तिच्या हाताखालच्या सरदारांना मानवले नाही, गियासुद्दीन बत्त्बन हा या घराण्यातील आणखी एक कर्तबगार राज्यकर्ता होय.
खिलजी घराणे (इ. स. १२९०-१३२०)
जलालुद्दीन खिलजी (इ. स. १२९०-९६) हा या घराण्याचा संस्थापक होय.इ. स. १२९६ मध्ये जलालुद्दीनचा खून करून त्याचा पुतण्या व जावई अल्लाउद्दीन खिलजी बाने दिल्लीची सत्ता बळकाविली. तो अत्यंत धोरणी, हुशार व पराक्रमी होता; एग त्यावबरोबर तो क्रूर, निष्ठुर, धर्मवेडा व हिंदूंचा द्वेष्टाही होता. त्याचे धार्मिक धोरण असहिष्णू वृत्तीचे होते. तो निरंकुश सत्ताधीश होता.देवगिरीच्या यादवांचा पाडाव करून मुसलमानी सत्ता दक्षिणेत वाढविण्याचे कार्य प्रथम अल्लाउद्दीननेच केले. इ. स. १३१६ मध्ये त्याचा मृत्यू झाला. अल्लाउद्दीन खिलजीनंतर शहाबुद्दीन उमर (१३१६ अल्पवयीन), कुतुबुद्दीन मुबारकशहा (१३१६-२०) व नासिरुद्दीन खुसोखान (१३२०) हे या घराण्यात सत्तेवर आले.
तुघलक घराणे (इ. स. १३२०-१४१४)
गियामुद्दीन तुघलक
खिलजी घराण्याचा अखेरचा राज्यकर्ता नासिरुद्दीन खुखोखान बाला ठार करून गियासुद्दीन तुघलक (१३२०-२५) याने तुघलक घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली. गियासुद्दीनने आपल्या राज्याचा दक्षिण भारतात तसेच बंगालमध्ये विस्तार केला. गियासुद्दीन एक बांगला प्रशासक व न्यायधिव राजा होता. धार्मिक बाबतीत तो सहिष्णू होता, त्याने आपल्या राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या, उदाहरणार्थ- शेतसारा निश्चित केला, दळणवळणाच्या सोयी केल्या, शेतीला पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली, सर्वांना समान न्याय मिळण्याची व्यवस्था केली.
मुहंमद बिन तुघलक
मुहंमद बिन तुघलक हा तुघलक पराण्यातील आणखी एक महत्वाचा राज्यकर्ता होय. त्याच्या कारकिर्दीत त्याच्याविरुद्ध अनेक उठाव झाले; पण ते मोडून काढण्यात तो यशस्वी ठरला. मुहंमद बिन तुघलक (१३२५-५१) हा एक विद्वान व दूरदर्शी राज्यकर्ता मानला जातो. त्याच्या अंगी अनेक गुण होते. ती शूर योद्धा होता. त्याने अनेक विजय संपादन केले होते. त्याने आपल्या राज्याचा दक्षिण भारतात विस्तार पहजूर
एक कुशल प्रशासक, न्यायप्रिय शासक, विद्या व कलेचा आश्रयदाता म्हणूनही तो ओळखला जातो त्याच्याकडे अनेक चांगल्या योजना होत्या; परंतु त्या अमलात आणताना त्याने बऱ्याच गफलती केल्या. उदाहरणार्थ राजधानी बदलणे, सोन्याऐवजी तांब्याची नाणी चलनात आणणे वगैरे, त्यामुळे त्याला प्रत्यक्ष व्यवहारात अनेकदा अपयश आले. मुहंमद बिन तुघलकाविषयी अगदी परस्परविरोधी मते व्यक्त केली जातात. काही जण त्याला प्रतिभावंत राज्यकर्ता म्हणतात, तर काही जण त्याला लहरी, स्वप्नरंजनात रममाण होणारा व व्यवहाराचे भान न ठेवणारा शासनकर्ता म्हणतात; पण त्याच्या काही योजना फसल्या असल्या तरी राज्यहिताचा विचार करूनच त्याने त्या आखल्या होत्या, हे लक्षात येणे आवश्यक आहे.
फिरोज तुघलक
मुहंमद बिन तुघलकाच्या मृत्यूनंतर त्याचा चुलतभाऊ फिरोज तुघलक (१३५१-८८) हा गादीवर आला. तो प्रजाहितदक्ष राजा होता. प्रवेच्या कल्याणासाठी फिरोज तुघलकाने आपल्या राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या. राज्यात विहिरी व कालचे खोदून शेतीसाठी पाणीपुरवठ्याच्या सोयी केल्या. गोरगरिबांसाठी दवाखाने सुरू केले. शाळा उपडल्या. अनेक नवी शहरे बसविली. विद्या व कला यांना उतेजन दिले; पण धार्मिक बाबतीत तो असहिष्णू वृत्तीचा होता. त्याने हिंदुधर्मीयांका जुलमी जिझिया कर लादला,
त्याच्यानंतर गियासुद्दीन तुघलक दुसरा, अबू बकर, नासिस्दीन मुहमद, हुमायून, नासिरुद्दीन मुहंमदशहा हे राज्यकर्ते तुपतक घराण्यांत होऊन गेले; पण अखेरचे हे सर्व राज्यकर्ते अतिशय कमकुवत होते. त्यामुळे तुघलक घराण्याच्या पतनास तेच कारणीभूत ठरले.
सय्यद घराणे (इ. स. १४१४-५१)
खिजरखान सय्यद
हा सम्यद पराण्याचा संस्थापक होय तुषलक घराण्यातील अखेरचा सुलतान नासिरुद्दीन मुहंमदशहा बाच्या मृत्यूनंतर दौलतखान लोदी याने दिल्लीची गादी मिळविली; परंतु, तैमूरलंग याचा भारतातील प्रतिनिधी खिजरखान सय्यद (१४१४-२१) याने १४१४ मध्ये दौलतखान लोदीचा पराभव करून दिल्ली काबीज केली. अशा रीतीने दिल्लीवा सय्यद घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. खिजरखानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुचारफलाहा (१४२१-३४) हा दिल्लीच्या गादीवर आला. त्याला आपल्या अनेक शत्रूशी सामना करावा लागला, तो न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जातो; परंतु त्याचा वजीर सरवर-उल-मुल्क याने त्याचा वध करविला
मुबारकशहानंतर मुहंमदशहा (१४३४-४५) हा राज्यावर आला; परंतु तो फारसा कर्तबगार नसल्याने त्याच्या कारकिर्दीत त्याचे काही सुभेदार स्वतंत्र होऊन राज्यकारभार चालवू लागले. मुहंमदशहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन आलमशहा हा दिल्लीच्या गादीवर आला परंतु तोदेखील कमकुवतच निघाला. त्यामुळे बहलोल लोदी याने स्वतःला दिल्लीचा सुलतान म्हणून घोषित केल्यावर अल्लाउद्दीनने आपणहून दिल्लीची गादी सोडली.
लोदी घराणे (इ. स. १४५१-१५२६)
बहलोल लोदी
बहलोल लोदी (१४५१-८९) हा लोटी घराण्याचा संस्थापक होय, तो स्वतः अफगाण असल्याने त्याने आपत्त्या राज्यात अफगाण सरदारांना उच्च पदे दिली. गादीवर आल्यावर त्याने सत्ता बळकट करण्याचे प्रयत्न केले. बहलोल लोदीनंतर त्याचा मुलगा सिकंदर लोदी (१४८९-१५१७) गादीवर आला. त्याला सत्ता मिळविताना आपल्या विरोधकांशी संघर्ष करावा लागला; पण त्यात तो यशस्वी ठरला. त्याने आपला राज्यविस्तार बराच वाढविला, आपल्या अनेक शत्रूवर त्याने मात केली. त्याने आग्रा ही अत्पली राजधानी बनविली. तो विद्या व कला यांचा आश्रयदाता होता. तसेच तो एक चांगला प्रशासक आणि कुशल सेनापती होता; पण धार्मिक चाबतीत तो असहिष्णू होता. त्यामुळे त्याने हिंदूंना बराच त्रास दिला. त्याने आपल्या हाताखालील सरदारांना नियंत्रणाखाली ठेवले आणि सुलतानाची सत्ता ब प्रतिष्ठा वाढविली.
इब्राहिम लोदी
इब्राहिम लोदी (१५१७-२६) हा लोदी पराण्याचा अखेरचा राज्यकर्ता होय. त्याला सत्ता मिळविण्यासाठी आपल्या भावांशी संघर्ष करावा लागला. त्याने ग्वाल्हेर जिंकून घेतले; पण मेवाडच्या राणा संगाकडून मात्र त्याला पराभूत व्हावे लागले. आपल्या राज्याची सर्व सत्ता स्वतःच्या हातीच ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यामुळे त्याचे सरदार त्याच्यावर नाराज झाले. इब्राहिम लोदी हा शूर व पराक्रमी योद्धा होता. तो न्यायप्रिय व शुद्ध आचरणाचा राजा म्हणूनही प्रसिद्ध आहे; परंतु त्याच्याकडे पुरेसा धोरणीपणा नव्हता. मुत्सद्देगिरीत तो कमी पडला. इ. स. १५२६ मध्ये बाबरने त्याच्यावर स्वारी केली. त्यांच्यात पानिपत येथे युद्ध होऊन त्यात इब्राहिम लोदी ठार झाला, अशा रीतीने दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली.









