महाराष्ट्राचा इतिहास । History of Maharashtra in Marathi
महाराष्ट्र नावाची व्युत्पत्ती
‘महावंश’ नावाच्या बौद्ध ग्रंथात इ.स. ५०० ध्या सुमारास केला गेलेला ‘महार’ असा उल्लेख सापडतो. हा उल्लेख ‘महार’ आणि ‘ख’ या दोन जातिवाचक नामांच्या संयोगाने झाला असावा, असे मानले जाते. मोल्स्वचे यांच्या शब्दकोषच्या प्रस्तावनेत डॉ. जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महार-राष्ट्र अशी व्युत्पत्ती लावली आहे. गुर्जरांचे राष्ट्र ते गुर्जरराष्ट्र, शहांचे राष्ट्र ते सौराष्ट्र त्याचप्रमाणे महारांचे राष्ट्र से महाराष्ट्र, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. डॉ. ओपर्ट व डॉ. केतकर यांनीही वा मतास पुष्टी दिली आहे.
रास्टीकचे मूळ संस्कृत रूप राष्ट्रिक असे असून राष्ट्रिक हे बहुधा महाराष्ट्रातील असावेत, असा तर्क करून डॉ. भांडारकर प्रतिपादन करतात की, “भोजांचा जसा पुढे महाभोज झाला तद्वतच राष्ट्रिक है महाराष्ट्रिक झाले व त्यांचा देश ती ‘महाराष्ट्र महान राष्ट्र से महाराष्ट्र, अशी साधी सरळ व्युत्पत्ती महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी केली आहे. महान पराक्रमी तो महापराक्रमी, महान पुरुष तो महापुरुष तद्वच महान राष्ट्र ते महाराष्ट्र। महानुभाव बाड्मयातही ‘महंत राष्ट्र म्हणोनि महराष्ट्र असा उल्लेख आहे.
शं. बा. जोशी यांच्या मते, महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव ‘मरहट्ट’ असे होते. हे नाव कानडी आहे. शं. वा. जोशी म्हणतात, महाराष्ट्रात पूर्वी हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती होती. मर झाडी आणि हड्डी हाट जातीचे लोक. मरह म्हणजे ‘हाट लोकांचा झाडीयुक्त देश जोशीच्या मते मरहट्टचे पुढे महाराष्ट्र झाले.
मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणा
महाराष्ट्रात अश्मयुगातही मानवाची वस्ती होती, असे पुरावे अलीकडील काळात मिळाले आहेत. अश्मयुगातील प्रत्येक अवस्थेत महाराष्ट्राच्या भूप्रदेशात मानवाची वस्ती होती, असे मिळालेल्या जीवाश्मांवरून दिसून येते. ताम्रपाषाण युगात साब्यापासून व दगडांपासून बनविलेली हत्यारे वापरणाऱ्या टोळ्या येथे स्थायिक झाल्या. इ. स. पूर्व अठराशेच्या सुमतास सिधू संस्कृतीमधील लोक या प्रदेशात आले. इ. स. पूर्व सोळाशेमध्ये आलेल्या माळव्यातील शेतकन्यांनी तापी, गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोन्यांत बस्ती केली होती, असे दिसून येते.
महाराष्ट्रात एके काळी नांदलेल्या जोर्वे संस्कृतीचा शोध इ. स. १९५० मध्ये जोर्वे येथे केल्या गेलेल्या उत्खननातून लागला, या संस्कृतीचा उगम इ. स. पूर्व चौदाशेच्या सुमारास झाला असावा. कोकण आणि विदर्भात महाराष्ट्रातील प्रदेशल या लोकांची वस्ती होती. जो संस्कृतीतील आदी धान्ये पिकवीत व गाय, म्हैस, शेळी आदी प्राणी पाळीत यांना महाराष्ट्रातील आद्य शेतकरी असे म्हणता येईल
नंद व मौर्य घराण्यांचा संबंध
इ. स. पूर्व सातव्या आठव्या शतकांनंतर महाराष्ट्रात लोहयुगाची सुरुवात झाली. येथून पुढे इ. स. १२९८ पर्यंतचा काळ आपण प्राचीन कालखंड म्हणून ओळखतो. या काळाच्या सुरुवातीस उत्तर महाराष्ट्रात नंद व भौर्य घराण्यांची साम्राज्ये प्रस्थापित झाली होती. या नंदांचा महाराष्ट्रासी काही संबंध आला होता किंवा नाही, यासंबंधी काही माहिती मिळत नाही. नंदाचे ‘नवनंद देहरा’ म्हणजेच आताचे ‘नाटेड’ असावे, असे काही विद्वानांचे मत आहे.
मात्र मौर्याचा महाराष्ट्राशी संबंध आला होता, असे नाधार म्हणता येते. मौर्य सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखापैकी एक शिलालेख आपणास ठाणे जिलात सोपारा येथे मिळतो; तर आणखी एक शिलालेख आपणास महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास सिद्धापूर येथे सापडतो. अशोकाने महाराष्ट्रात ‘धर्मरक्षित’ व ‘महाधमरक्षित या नावाने दोन धर्मप्रसारक पाठविल्याचा उल्लेख सापडतो.
सातवाहनांची अधिसत्ता
मौर्यानंतर सातवाहनांनी महाराष्ट्रात राज्य केले. सातवाहनांपासून महाराष्ट्राचा इतिहास अधिक सुसंगत मांडता येतो. पैठण ही अनेक वर्षे सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन हे मूळचे पैठणचेच; त्यामुळे सातवाहनांचा उल्लेख ‘महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले महाराष्ट्रीय घराणे असा करता येईल. सातवाहन घराण्यातील पहिला सातकर्णी या पराक्रमी राजाच्या नागनिकायारामांचा उल्लेख नाणेघाट येथे मिळाला आहे. पुराणांमध्ये सातवाहन घराण्यातील अनेक राजांचा उल्लेख सापडतो. हाल हा या घराण्याडील सतरावा राजा होय. याने ‘गाहा सत्तसई’ (गाथा सप्तशती) हा काव्यसंग्रह रचल्याचे वाङ्मयीन इतिहासावरून दिसून येते.
यज्ञश्री सातकर्णी याने उत्तर कोकण किंवा अपरांत गंत इ. स. १९० च्या सुमारास विकला याचे काही शिलालेख रायगड जिल्ह्यात कान्हेरी येथे, तसेच नाशिक येथे सापडले असूर चंद्रपूर येथे त्याची नाणी सापडली आहेत. सातवाहनकाळात महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत प्रगती पडून आली. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक बौद्ध लेणी याच काळात खोदली गेली असावीत. इ.स.पूर्वपहिल्या दुस-या शतकाराने पिताखोरा येथे खोदली गेलेली लोगी काळातली ही तेथी भारतातील सर्वांत प्राचीन लेगी मानली जातात.
सातवाहनकाळात कल्याण, चौल, सोपारा इत्यादी बंदरांचा उत्कर्ष झाला; तर जुअर, नाशिक, कोल्हापूर, पैठण, तेर, भोकरदन यांस्रारखी ठिकाणे व्यापारी पेठा व राजकीय केंद्रे म्हणून मान्यता पावली.
अभिर व त्रैकुटक राजे
सातवाहनांनंतर अभिरांनी त्यांच्या आगेमागे त्रैकुटक राजांनी महाराष्ट्राच्या काही भागांत राज्य केले. जैकुटक राजे अमिरांचे मांडलिक असावेत, असे दिसून येते. वैकुटक राजा दहरसेन याची नाणी सातारा व पुणे जिल्ह्यांत सापडली आहेत.
वाकाटकांची कारकीर्द
वैकुटकांनंतर वाकाटकांनी महाराष्ट्रात राज्य केले. इ. स. तिसरे ते पाचवे शतक हा यांचा कालखंड मानला जातो. यांचे राज्य मुख्यत्वे विदर्भ व परिसरात पसरलेले होते, अनिठा बेभील काही चैत्य व विहार वाकाटककाळात खोदाण्यात आले, अजिंठा येथील काही चित्रेही याच काळात रंगविली गेली. अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यातील उत्कीर्ण लेखावरून या घराण्यातील विध्यशक्ती या राजाबद्दल काही माहिती मिळते.
विध्यसेनाचा मुलगा प्रवरसेन याचा प्रधान हरिसेन बाचा उल्लेख अजिंठा येथील घटोत्कच लेण्यातील लेखात आला आहे. प्रवरसेनाचा मुलगा सर्वसेन हा वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम येथे, तर त्याचा नातू रुद्रसेन हा नागपूरजवळच्या पुरीका अथवा नंदीवर्धन येथे राज्य करीत होता. गुप्त सम्राट दुसरा बंद्रगुप्त याची मुलगी प्रभावतीगुप्ता हिच्याशी सम्म करणारा दुरुमा स्ट्रसेन हा या वाकाटक घराण्यातीलच । प्रभावतीगुप्ताच्या एका लेखात रामगिरीचा म्हणजेच सध्याच्या रामटेकचा उल्लेख आला आहे. वाकाटकांच्या काळानंतरचा महाराष्ट्राचा इतिहास फारसा सुसंगत नाही.
कलचुरी व बदामीचे चालुक्य
सहाच्या ते आठव्या शतकांमध्ये बदामीच्या चालुक्यांची सत्ता येथे प्रस्थापित होण्यापूर्वी काही काळ कलचुरी पराण्याची सत्ता महाराष्ट्रात होती. दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील बलशाली राजा होय. त्याच्या एका लेखात तीन महाराष्ट्रकांचा उल्लेख आढळतो.
राष्ट्रकुटांचा कालखंड- सांस्कृतिक क्रांती
चालुक्यांनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकजिनसी अंमल प्रस्थापित झाला तो राष्ट्रकूट कालखंडात, यांनी इ. स. च्या आठल्या ते दहाव्या शतकांपर्यंत महाराष्ट्रावर अधिराज्य प्रस्थापित केले होते. वेरुळच्या दशावतार लेण्यातील लेखात राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याची स्तुती केली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भावर याची सत्ता होती. याच्या कारकिर्दीतील जगदुविख्यात कैलास लेण्याच्या खोदकामास प्रारंभ झाला.
आठव्या शतकात या घराण्यातील पहिल्या कृष्णदेव-राजाच्या कारकिर्दीत या लेण्यास पूर्णत्व प्राप्त झाले. राष्ट्र-कूटकाळात साहित्य, कला व वास्तुशिल्प यांना उत्तेजन मिळाल्याचे दिसून येते.
चालुक्य
राष्ट्रकुटांच्या पाडावानंतर उत्तरकालीन चालुक्यांनी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत आपली सत्ता प्रस्थापित केली. इ. स. च्या दहाव्या शतकात होऊन गेलेला चालुक्य राजा दुसरा सैल किंवा तैलप बाचा उल्लेख सापडतो. याने दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रातील गोदावरी खोल्यातील प्रदेश आपल्या अमलाखाली आणला होता. याच वंशातील राजा पहिला सोमेश्वर याने कोल्लापूर म्हणजे सध्याचे कोल्हापूर या गावाचे चोलांच्या आक्रमणापासून रक्षण केल्याचा उल्लेखही मिळतो.
शिलाहार-महालक्ष्मीचे उपासक
इ. स. चे नववे ते तेरावे शतक या कालखंडात शिलाहारांनी तीन घराणी- एक उत्तर कोकणात; दुसरे दक्षिण कोकणात आणि तिसरे मिरज, कन्हाड व कोल्हापूर या भागांत राज्य करीत होती. शिलाहार घराण्यातील गण्डादित्यराजाने मिरजजवळ ‘मण्डलमुद्र’ नावाचे तळे बांधले. शिलाहारांचे अनेक लेख कोकणपट्टीत व दक्षिण महाराष्ट्रात उपलब्ध झाले आहेत.कल्याणजवळ अंबरनाथ येथे असलेले शिवमंदिर शिलाहारकाळातील आहे. शिलाहार हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे उपासक होते.
यादवांची वैभवशाली कारकिर्द
शिलाहारांचा पाडाव करून यादव घराण्याने महाराष्ट्रात आपली सता प्रस्थापित केली. यांची राजधानी प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील सेऊणपूर म्हणजेच सध्याचे सिजर येथे होती, कालांतराने या घराण्यातील राजा पाचना भिल्लम याच्या काळात ही देवगिरी येथे स्थानांतरित झाली. यादव राजा रामचंद्रदेव याच्या काळात यादवांची सत्ता विदर्भातील बऱ्याच मोठ्या भू-भागावर प्रस्थापित झाली होती.
हेमाद्री किंवा हेमाडपंत हा रामचंद्रदेव यादवाचा प्रधान होता, उत्तम चास्तुविशारद असलेल्या या हेमाडपंताच्या मार्गदर्शनाखाली बादवकाळात अनेक मंदिरे बांधली गेली. या काळातील मंदिरचांधणीची शैली पुढे ‘हेमाडपंती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. मराठी भाषा, मराठी वाड्मय व महाराष्ट्रीय संस्कृती यांच्या उत्कर्षाचा विचार करता यादवांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरते. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ वाच काळात उदयास आला.
महानुभावांचे ‘चरित्रग्रंथ’ व ‘सातीप्रथ’ वाच काळात निर्माण झाले. मुकुंदराबाचा ‘विवेकसिंधु’ हा उपलब्ध मराठी ग्रंथापैकी ‘आद्य मराठी ग्रंथ’ गणला जातो. या आद्य मराठी ग्रंथाची निर्मिती याच काळात झाली. ‘ज्ञानेश्वरी’चा जन्मही याट्यकाळातलाच निवृत्तिनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव, समदेव, गोरा कुंभार, सावता माळी, विसोबा खेबर, सेना न्हावी यांसारखी संतमंडळी व त्यांचे बाड्मयही याच काळात उदय पावले.
यादव साम्राज्याचा अस्त
अल्लाउद्दीन खिलजी व त्याचा सेनापती मलिक काफूर याच्या स्वायऱ्यांनी यादव सत्ता खिळखिळी झाली. शंकरदेव व हरपालदेव हे शेवटचे राने खिलजींकडून मारले गेले व यादव साम्राज्यावर खिलजीचा अंमल प्रस्थापित झाला.
तुघलकांचे आधिपत्य
खिलजींनंतर देवगिरीचे साम्राज्य तुघलकांच्या आधिपत्याखाली आले. मुहंमद तुघलकाच्या काळात दिल्लीची राजधानी देवगिरीला आणण्यात आली. तुघलकांच्या आगेमागेच सुफीपंमीय अवलिये देवगिरीच्या परिसरात स्थायिक झाले होते. या अवलियांनी महाराष्ट्रात जरी इस्लामचा प्रचार-प्रसार केला तरी त्यांचे एकूण विचार सहिष्णू व उदप्रमतवादी होते. हिंदू धर्मातील संतांप्रमाणेच त्यांनी प्रेम व भक्ती यांचाच संदेश दिला. मुहंमद तुपालकाच्याच काळात देवगिरीचे नामांतर दौलताबाद असे केले गेले.
बहामनींचा उदय व विघटन
मुहमदाने आपली राजधानी पुन्हा दिल्लीकडे नेली न नेली तीच हसनगंगूने दख्खनेत बहामनी राजवटीची स्थापना केली. बहामनीच्या काळातच राजधानी दौलताबादहून गुलबग्यर्यालय हलविली गेली. इ. स. १३३६ मध्ये विजयनगरच्या राज्याचा उदय झाला. कालांतराने विजयनगर हे दक्षिणेतील बलशाली साम्राज्य.
मुहंमद गावान या बजिराच्या मृत्यूनंतर बहामनींच्या साम्राज्याला उतरती कळा लागली व या राज्याचे पाच तुकडे पहले, गोवळकोडपाची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, एलिबपूरची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही व बिदरची बरीदशाही या पाच शाह्या बहामनी साम्राज्याच्या विघटनातून उभ्या राहिल्या. हा सर्व कालावधी बहुतांशी बहामनी साम्राज्य किंवा या पाच शाह्या आणि विजयनगरचे साम्राज्य यांच्या संघर्षाचाच होता.
यांच काळात या मुस्लीम राजवटीमध्ये परदेशातून आलेले मुस्लीम व स्थानिक मुस्लीम यांच्यात अंतःस्थ संघर्ष चालू होता. वा शाह्यांनी पूर्वापार राजकारणात व समरांगणात असलेल्या येथील क्षत्रिय वर्गाचा आधार घेऊन राज्यकारभार चालविण्यास सुरुवात केली. त्यातूनच आरंभीच्या काळातील मराठा सरदार निर्माण झाले. या सरदारांनी आदिलशाही निजामशाहीत आपल्या कर्तबगारीवर आपापली स्थाने निर्माण केली; मोठमोठ्या काममिप्या केल्या व जहागिऱ्या संपादन केल्या.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी
आदिलशाही-निजामशाहीतील या मराठा सरदारांतूनब नृपकर्ता शहाजीराजे निर्माण झाले. एक प्रकारे शहाजीराजांच्या प्रेरणेने त्यांच्या मुलाने म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची अद्वितीय कामगिरी बजावली. शिवाजी महाराज मृत्यू पावले त्या वेळी त्यांनी आपल्या मागे लष्करीदृष्ट्या मजबूत राज्य आक्रमणास तोड देऊ शकतील असे बळकट गड-किल्ले व कार्यक्षम अशी प्रशासन यंत्रणा ठेवली होती.
शिवाजीराजांनंतर राज्यावर आलेल्या संभाजीराजांची कारकीर्द गृहकलहात व मोगलांना तोंड देण्यात खचर्ची पडली. शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज व राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराबाई यांनी मोगलांना कडवी झुंन दिली. धनाजी जाधव व संताजी घोरपडे हे पराक्रमी मराठा सरदार याच काळात उदयास आले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या वैदेतून स्वराज्यात पात आलेल्या शाहूराजांना ताराबाईंचा विरोध पत्करावा लागला.
शाहूराजांच्या काळातच परंपरागत पेशवेपदाची निर्मिती झाली. शाहूराजांचा पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथने दिल्लीत बादशहाकडून चौधाईच्या सनदा आणाल्या आणि दिल्ली दरबारात मराठ्थांचा व मराठा दरबारात पेशव्यांचा जम बसविला.
मराठी सत्तेचा उत्कर्ष व न्हास
बाळाजी विश्वनाथनंतर पहिला बाजीराव तदनंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या काळात मराठी सत्ता उत्कर्षास पोहोचली. नानासाहेबाच्या काळात तर तिने उत्कर्षांचा परमोच्च बिंदू गाठला. तथापि, बाच काळात इ. स. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांना प्रचंड पराभव पत्करावा लागला.
पानिपतच्या लढाईन मराठी सत्तेला फार मोठा हादरा दिला. यानंतर थोरल्या माधवरावाची कारकीर्द वगळता मराठी सत्ता हळूहळू का होईना पण उतरणीसच लागली. हा सर्व कालखंड पेशव्यांच्या गृहकलहाचा व मराठे सरदारांच्या आपापसांतील बेबनावाचाच ठरला.
रघुनाथराव पेशव्यांनी यशवंतराव होळकरांनी पुणे सुटणे यांसारख्या दुर्दैवी घटना यानंतरच्या काळात पडून आल्या. इ. स. १८०० मध्ये नानाफडणविसाचा मृत्यू झाला व मराठेशाहीतील उरलेसुरले शहाणपणही लयास गेले. ३. स. १८०२ मध्ये दुसत्या बाजीरावाने इंग्रजाची तैनाती फौज स्वीकारली आणि मराठी राजवटीता, सेबटबी परपर लागली.
१९ फेब्रुवारी, १८१८ रोजी जनरल स्मिथ आणि पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ‘अष्टी’ येथे धनयोर युद्ध होऊन गोखले मारले गेले. ३ जून, १८१८ रोजी दुसरा बाजीराव जॉन माल्कमच्या स्वाधीन झाला. १७ नोव्हेंबर, १८१८ रोजी पुण्याच्या शनिवारवाड्यावर इंधनांचा ‘युनियन बैंक फडकला.










1 thought on “महाराष्ट्राचा इतिहास । History of Maharashtra in Marathi”