गुप्त साम्राज्याची माहिती । Gupta dynasty information in Marathi

गुप्त साम्राज्याची माहिती । Gupta dynasty information in Marathi

प्राचीन भारतातील एक नावारूपाला आलेले व भारतीय इतिहासावर आपली स्वतंत्र छाप टाकलेले साम्राज्य म्हणून गुप्त साम्राज्याचा उल्लेख करावा लागतो. गुप्तकाळा ‘भारताच्या इतिहासातील सुवर्णपुरा’ अशा शब्दांत गौरव केला जातो. यावरून गुप्त साम्राज्याच्या महारतेची कल्पना येऊ शकते.

श्रीगुप्त

गुष्ठ घराण्याच्या सुरुवातीच्या इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, श्रीगुप्त हा या घराण्याचा संस्थापक होय, श्रीगुप्त व त्याचा मुलगा घटोत्कच गुप्त यांचे राज्य खूपच लहान होते. बहुधा ते मांडलिक राजे असावेत.

पहिला चंद्रगुप्त

गुप्तांच्या राज्याला महत्व प्राप्न झाले ते पहिल्या मंद्रगुप्ता-च्या (इ. स. ३९९-३५) काळातच त्याने ‘महाराजाधिराज’ असा किताब धारण केला, त्याने लिच्छवी राजकन्या कुमारदेवी हिच्याशी विवाह केला; तो राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरला. त्याने प्रयाग, साकेत, दक्षिण बिहार एवढ्या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याने इ. स. १२० मध्ये गुप्तसंवत् सुरू केला.

समुद्रगुप्त

समुद्रगुप्ताच्या (इ. स. ३३५-८०) काळात गुप्त साम्राज्य वैभवाच्या कळसास पोहोचले. त्याने उत्तर भारतातील अनेक लहानलहान राज्ये जिंकून घेऊन त्या प्रदेशात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पुढील काळात समुद्रगुप्त दक्षिण भारताध्या मोहिमेवर मेला, या मोहिमेतही स्थाने अनेक राजीव बुद्धात विजय मिळविला एवा त्याने धोरणीपणाने दक्षिणेतील राज्ये गुप्त साम्राज्याला जोडून न घेता त्यांना मांडलिक राज्ये बनविली या विजयानंतर समुद्रगुष्ठाने अश्वमेध यज्ञ केला. समुद्रगुप्त विद्या व कला यांचा आश्रयदाता होता. हरिषेण (दरबारी कवी), वसुबंधू यांसारखे विद्वान त्याच्या प‌ट्टी होते.

दुसरा चंद्रगुप्त

दुसरा बंद्रगुप्त (इ.स. ३८०-४१२) हा समुद्रगुप्ताचा मुलगा होय. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या विशाल साम्राज्यात त्याने भरच घातली. त्याने नाग व वाकाटक यांच्याशी विवाह-संबंध जोडून आपली सत्ता बळकट केली. आपल्या सीमेवर असलेल्या शक व अन्य शत्रूचा त्याने पराभव केला, शकांशी झालेल्या मुद्धात त्याने शक क्षत्रप तिसरा स्दसिंह यास ठार केले. इतर शत्रूचाही त्याने बिमोड केला. त्याने विक्रमादित्य, परमभागवत, महाराजाधिराज इत्यादी विशेषणे लावली होती. त्याने आपल्या राज्यात विविध प्रकारची नाणी पाडली होती. तो विद्वानांचा आश्रयदाता म्हणूनही प्रसिद्ध होता.

त्याच्या दरबारी ‘नवाले (महाकवी कालिदास नाटककार व कवी, धन्वंतरी वैद्य, क्षपणक फलज्योतिषी, घटकापर शिल्पकार व वास्तुविरामद, शंकू चास्तुविशारद, सरकली पंडित, वराहमिहीर खगोलतज्ञ, गणितज्ञ व फल-ज्योतिषी, वेताळभट्ट स्वकृत कती अमरसिंह व्याकरणज्ञ व कती है नऊ विद्वान) असल्याचे सांगितले जाते. त्याच्याच कारकिर्दीत फाहियान वा चिनी प्रवाशाने भारतास भेट दिली. दुसन्या चंद्रगुप्तानंतर गुप्त पराण्यात पहिला कुमारगुप्त (इ. स. ४१४-५५), स्कंदगुप्त (इ.स. ४५५-१७), पुरुगुप्त, दुस्ता कुमारगुष्ठ, नरसिंहगुप्त, बुद्धगुप्त तथा गुप्त মানুगुप्त इत्यादी राज्यकर्ते होऊन गेले. स्कंदगुप्तानंतरच्या गुप्त राजांसंबंधी निश्चित व विश्वसनीय माहिती मिळू शकत नाही. संभाव्यत्या वेळेपासूनच गुप्त सम्राज्याला उतरती कळा लागली असावी. स्कंदगुप्तानंतरचे राजे विशेष परमी व कर्तृत्ववान नव्हते. त्याचा फायदा पूर्वीच्या मांडलिक राजांनी उठविला, त्यातच हुमांचे आक्रमण व पुष्यमित्र टोळ्यांचा उठाव पामुळे साम्राज्य कमकुवत होत गेले.

राजकीय व सामाजिक परिस्थिती

गुप्त राजांनी विशाल साम्राज्याची निर्मिती करून राज्यात सर्वत्र शांतता प्रस्थापित केल्याने प्रजेला दीर्घकाळ राजकीय स्वैर्य अनुभवता आले. राज्याची सत्ता पूर्णपणे राजाच्या हातीच केंद्रित झाली होती. पण, राजसत्ता अनियंत्रित स्वरूपाची व्हती. राजाला सल्ला देण्यासाठी व मदत करण्यासाठी मंत्री, अमात्य इत्यादी अधिकारी असत. काही ठिकाणी ‘सभा’ या संस्थेचाही उल्लेख आढळतो. गुप्त राने उत्तम प्रशासक होते. भारताला मौर्यांनंतर सुनियंत्रित व एकसंध प्रशासन दिले ते गुप्तांनीच त्यांनी राज्याच्या प्रशासनाचे वेगवेगळे विभाग पाडले होते आणि प्रत्येक विभागावर स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात होती. अधिकान्यांच्चाही वेगवेगळ्या श्रेणी होत्या.

गुप्त काळातील समाजव्यवस्थेचा विचार करता असे दिसून येते की, या काळात जातिव्यवस्थेचे निर्बंध अधिक कवाक झाले होते. समाजात ब्राह्मणांना उच्चस्यान प्राप्त झाले होते. शूद्र जातीच्या लोकांना तुच्छतेची वागणूक मिळत होती. अस्पृश्यतेची प्रथा रूढ झाली होती, जातिजातीत रोटीबेटी व्यवहारावर कडक निर्बंध घातले गेले होते. गुप्त काळात समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. स्मृती, पुराणे बांतून मुलींच्या विवाहाचे वय कमी करण्याचा विचार मांडल्याने बालविवाहाची प्रथा अस्तित्वांत आली होती.

स्त्रियांना बेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. बहु-पत्नीकाचाची पद्धत रूढ झाली होती. त्या काळी एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. विवाह हा पचित्र संस्कार मानला बाई. स्वीला कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा अधिकार नव्हता.

आर्थिक स्थिती

ग्रामीण भागातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. सेतीतून गहू, तांदूळ, मका, डाळी, तीळ इत्यादी पिके घेतली जात. पाशिवाय लहानमोठे व्यवसाय व्यापार बांतही प्रगती झाली होती. व्यापार प्रामुख्याने वैश्यांच्या हाती असे. व्यवसाय व जाती यांची सांगड घातली जाऊ लागली. गुप्त काळ आर्थिक सुबत्तेचा काळ समजला जाती. लोकांची आर्थिक स्थिती चांगली होती. सर्वसाधारणपणे लोक सुखी होते. अर्थात, समाजात आर्थिक विषमता ही होतीच; पण लोक सुखासमाधाराने जीवन जगत होते. त्यांच्या आहारात दूध-दुभते, फळे, रालेभाज्या व वेगवेगळ्या प्रकारची धान्ये बांचा समावेश असे ब्राह्मण सोडून इतर जातीतील लोक मद्यपान व मांसाहार करीत.

धार्मिक स्थिती

गुप्त राने वैदिक धर्माचे अभिमानी होते. त्यामुळे या काळात वैदिक धर्माला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले. गुप्त राजांनी बज्ञासारख्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन केले. अर्थात, प्राचीन जैदिक धर्माच्या स्वरूपातही बदल होत होता, एकाना वैदिक धर्माचे हिंदू धर्मात रूपांतर होऊ लागले होते. वैदिक धर्मातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे या धर्मात भक्तिपंथांची वाद होऊ लागली होती. सर्वसामान्य लोकांत भक्तिमार्गाविषयी आकर्षण वाढले होते. त्यामुळे समाजात वैष्णव पंथ, शैव पंथ, शाक्त पंथ, सौर पंथ असे वेगवेगले पंथ निर्माण झाले. वरील सर्व पंथ हिंदू धर्माचेच पटक मानले गेले, मक्ति-मार्गाच्या लोकप्रियतेमुळे अनेक देवदेवतांची मंदिरे उभारली बाऊ लागली. थोडक्यात, राजाश्रय व लोकाश्रय बांमुळे हिंदू धर्माचे महत्व बाहू लागले.

अर्थात, अन्य भारतीय राज्यकत्यांप्रमाणेच गुप्त राजांनीही धार्मिक सहिष्णुतेचेच धोरण अंगिकारले होते. त्यामुळे बौद्ध, जैन या धर्मचि अस्तित्व कायम राहिले, इतकेच नव्हे तर त्या धर्माच्या अनुयायांनी आपले धर्मप्रसाराचे कार्यही चालूच ठेवले, परंतु, या काळात बौद्ध व जैन धर्माचा जोर ओसरू लागला होता.
साहित्य, विद्या, कला या बाबतीतही गुप्त काळात अत्यंत प्रगती झाली होती. म्हणून गुप्त काळ विद्या व फलेचाही सुवर्णकाळ मानला जातो.

या काळात संस्कृत साहित्यात मोलाची भर पडली. अनेक श्रेष्ठ साहित्यिक या काळात होऊन गेले. कालिदास, विशाखादत, शुद्रक, भारी, विष्णुशर्मा, बुद्धपोष, वीरसेन, बासभट्ट, सिद्धसेन इत्यादीचा या संदर्भात उल्लेख करणे आवश्यक उरते. भौतिकशास्त्रातही या काळात भरीव प्रगती झाली. आर्यभट्ट, वराहमिहीर, वाग्भट, नागार्जुन हे सर्वजण या करता तीलच होत. हिंदू धर्मात पुराणांना महत्वाचे स्थान आहे. यांपैकी अनेक पुराणी रचना गुप्त काळात पूर्ण झाली. नारद, बृहस्पती, कात्यायन इत्यादी स्मृतिग्रंथ या काळातच तयार झाले.अपरसिंह, गबर, वसुबंधू, असंग, चंद्रकीर्ती यांसारखे विद्वान या काळात होऊन गेले. त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करता येईल. शिल्पकला, स्थापत्यकला, चित्रकला, संगीत, नाटा इत्यादी कलांचाही गुप्त काळात खूप विकास झाला होता.

1 thought on “गुप्त साम्राज्याची माहिती । Gupta dynasty information in Marathi”

Leave a Comment