गव्हर्नर जनरल व राष्ट्रपती | Governor General and President Information in Marathi

गव्हर्नर जनरल व राष्ट्रपती | Governor General and President Information in Marathi

लॉर्ड माऊंटबॅटन

परतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तरले. १५ ऑगस्ट, १९४७ ते २१ जून, १९४८ या कालखंडात त्यांनी हे पद भूषविले, यानंतर जवळजवळ तीस वर्षांनी २७ ऑगस्ट, १९७७९ रोजी आयरिश दहशतवाद्यांकडून त्यांची हत्या झाली.

चक्रवर्ती राजगोपालाचारी

चक्रवर्ती राजगोपालाचारी (१८७९-१९७२) हे स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल होत. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ठरण्याचा मानही त्यांनाच मिळाला. २१ जून, १९४८ ते २४ जानेवारी, १९५० या कालखंडात त्यांनी हे पद भूषविले.

डॉ. राजेंद्रप्रसाद

यांचे संपूर्ण नाव राजेंद्रप्रसाद महादेव सहाय. डॉ. राजेंद्रप्रसाद (१८८४-१९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होत. त्यांनी २६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ पर्यंत म्हणजे बारा वर्षांहून अधिक काळ हे पद भूषविले. सर्वाधिक काळ राष्ट्रपतिपदी राहण्याचा मान डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडेच जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होत. १३ मे, १९६२ ते १३ मे, १९६७ असा संपूर्ण पाच वर्षांचा कालखंड त्यांनी राष्ट्रपतिपद भूषविले. तत्पूर्वी त्यांनी उपराष्ट्रपतिपदही भूषविले. भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती होत. बोर तत्त्वज्ञानी व शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही ते प्रसिद्ध होते. ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाती.

डॉ. झाकीर हुसेन

डॉ. झाकीर हुसेन (१८९७-१९६९) हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होत. १३ मे, १९६७ ते ३ मे १९६९ या कालखंडात यांनी भारताचे राष्ट्रपतिपद भूषविले. हा कालखंड इतर कोणत्याही राष्ट्रपतीच्या कारकिर्दषिक्षा कमी आहे. थोर शिक्षणतज्ञ असलेले झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती होत.

वराहगिरी व्यंकटगिरी

व्ही. व्ही. गिरी या संक्षिप्त नावानेच परिचित वराहगिरी व्यंकटगिरी यांनी २४ ऑगस्ट, १९६९ ते २४ अऑगस्ट, १९७४ या कालखंडात पूर्ण पाच वर्षे राष्ट्रपतिपद भूषविले. भारताचे ते श्रीचे राष्ट्रपती होत, या सर्वोच्चपदी आरूढ होणारे ते पहिले कामगार नेते होत.

फक्रुद्दीन अली अहंमद

फक्रुद्दीन अली अहंमद (१९०५-७७) यांनी २४ ऑगस्ट, १९७४ ते ११ फेब्रुवारी, १९७७ या कालखंडात भारताचे पाचवे राष्ट्रपती म्हणून पद भूषविले. वाच्याच स्वाक्षरीने देशात आणीबाणी जाहीर करणारा वटहुकूम जारी केला गेला. भारताचे ते दूसरे मुस्लीम राष्ट्रपती होत.

नीलम संजीव रेडी

नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ ते २५ जुलै, १९८२ या कालखंडात भारताचे सहावे राष्ट्रपती म्हणून पद भूषविले, वयाच्या चौसष्टाव्या वर्षी राष्ट्रपती म्हणून सूत्रे हाती घेताना ते भारताचे सर्वांत तरुण राष्ट्रपती ठरले. त्यानी तत्पूर्वी लोकसभेचे सभापतिपदही भूषविले होते. ही दोनही पदे भूषविणारे ते एकमेव व्यक्ती होत.

ग्यानी डील सिंग

२५ जुलै, १९८२ ते २५ जुलै १९८७ या कालखंडात भारताचे सातवे राष्ट्रपती म्हणून पद भूषविताना ते भारताचे पहिले शीख राष्ट्रपती ठरले, पांच्याच कारकिर्दीत पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या अधिकाराचा प्रश्न धसास लागला गेला व पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना द्यावयाच्या माहिती संदर्भातील घटनेतील कलम ७८(१) वर बराच ऊहापोह झाला.

आर. व्यंकटरामन

वयाच्या ७६ व्या वर्षी भारताचे आठवे राष्ट्रपती महणून सूत्रे हाती घेणारे आर. व्यंकटरामन हे या पदाची सूत्रे हाती घेणारे सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती होत. त्यांच्याच कारकिर्दीत राजीव गांधी यांच्याकडून व्ही. पी. सिंग यांच्याकडे, व्ही. पी. सिंग यांच्याकडून चंद्र शेखर यांच्याकडे व चंद्रशेखर यांच्याकडून नरसिंह राव यांच्याकडे असे सर्वाधिक म्हणजे तीन वेळा सत्तांतर बडले. त्यांनी २५ जुलै १९८७ ते २५ जुलै, १९९२ असा पूर्ण काळ राष्ट्रपतिपद भूषविले.

डॉ. शंकर दयाळ शर्मा

२५ जुलै, १९९२ ते २५ जुलै, १९९७ या कालखंडात राष्ट्रपतिपद भूषविणारे डॉ. शंकर दयाळ शर्मा भारताचे नववे राष्ट्रपती होत. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी ही पदवी संपादित केली होती तसेच या विद्यापीठात काही काळ अध्यापनाचेही कार्य केले होते. एकूण आठ विद्यापीठांकडून सन्माननीय डॉक्टरेट्स मिळविणाऱ्या वा व्यक्तिमत्त्याने राष्ट्रपतिपदी आरूढ होण्यापूर्वी मुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल व उपराष्ट्रपती यांसारखी पदे भूषविली होती.

के. आर. नारायणन

संपूर्ण नाव कोचरेल रामन नारायणन, केरळमधील उझेपूर या खेड्यात गरीब कुटुंबात जन्म. रशियातील भारताचे माजी राजदूत, माजी केंद्रीय मंत्री, २१ ऑगस्ट, १९९२ ते २४ जुलै, १९९७ या कालावधीत भारताचे नबवे उपराष्ट्रपती. २५ जुलै, १९९७ ते २५ जुलै, २००२ या काला-वधीत भारताचे दहावे राष्ट्रपती, राष्ट्रपतिपदी निवडून येताना त्यांनी आपले प्रमुख प्रतिस्पर्धी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन बांचा पराभव केला होता. अनुसूचित जातींमधून राष्ट्रपतिपदी (तसेच तत्पूर्वी जनाष्ट्रपतिपदीही) विराजमान होगा से पहिलीच व्यक्ती होत.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

संपूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल फलाम, डॉ. कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी सध्याच्या तमिळनाडू राज्यातील पम्बन बेटावरील रामेश्वरम येथे झाला. डॉ. कलाम हे भारताच्या क्षेपणास्त्र व विकास कार्यक्रमामागील प्रमुख सूत्रधार होत. ‘पृथ्वी’, ‘त्रिशूल’ व ‘अग्नी’ यांची रचना, निर्मिती व विकास यांचे श्रेष त्यांच्याकडेच जाते. डॉ. कलाम हे ‘विज्ञान-श्री पारितोषिकाचे मानकरी असून १९८९ मध्ये त्यांना प‌द्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले. भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार या नाल्याने तद्वतच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) च डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीआरडीओ) मध्ये शास्वज्ञ महणून मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल १९९० च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना ‘प‌द्मविभूषण’ सन्मानाने विभूषित केले गेले. इ. स. १९९६ च्या गुजरमल मोदी पुरस्काराचे मानकरी होते.

भारताच्या सुरक्षा विभागात वैज्ञानिक संशोधन आणि भारताच्या सुरक्षा तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण या करिता त्यांनी दिलेल्या विशेष योगदानासाठी १ मार्च, १९९८ रोजी
‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना प्रदान केरला गेला इंदिराजीच्या स्मृतिदिनी ३१ ऑक्टोबर, १९९८ रोजी १९९७ चा राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविले गेले, डॉ. अब्दुल कलाम यांनी संरक्षण खात्याचे वैज्ञानिक सल्लागार, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण, संशोधन व विकास संघटनेचे प्रमुख यांसारखी महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यांना यथार्थतने दी मिसाईल मैन ऑफ इंडिया म्हणून गौरविले जाते. २५ जुलै, २००२ ते २५ जुलै, २००७ या कालावधीत त्यांनी भारताचे राष्ट्रपतिपद भूषविले. भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून निवडून येताना त्यांनी एकेकाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी, आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल (स्वामिनाथन) यांचा पराभव केला. भारवात्न’ सन्मान प्राप्त केल्यानंतर राष्ट्रपतिपदी विराजमान होणारे से डॉ. राधाकृष्णन व डॉ. झाकीर हुसेन याच्यानंदर तिसरे भारतीय होत.

‘विग्ज ऑफ फावर अॅन ऑटोचायोग्राफी’, ‘इंडिया २०२०’, ‘एन्व्हिशनिंग अँड ए पावर्ड नेशन’ व ‘इनायटेड माईंड्स् दी अनक्लिशिंग पॉवर बिदिन इंडिया’, बियाँड २०२०, ट्रान्सेनडेस: माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ परमुख स्वामिनी या ग्रंथांचे कर्तृत्व भारताच्या या माजी राष्ट्रपतीकडे जाते. डॉ. अब्दुल कलाम यांचे २० जुलै, २०१५ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षीं भारतीय व्यवस्थापर संस्थेच्या (आयआयएम शिलांग) विद्याध्यसमीर व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने देहावसान झाले.
प्रतिभाताई पाटील (शेखावत) २५ जुलै, २००७ रोजी भारताच्या बाराव्या राष्ट्रपती महणून सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपतिपदी विराजमान होणाऱ्या त्या बाराची व्यक्ती (प्रभारी राष्ट्रपती सोडून) होत. भारताच्या या पहिल्या महिला राष्ट्रपतीने राष्ट्रपतिपदी निवड होण्यापूर्वी राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल ठरण्याचा मानही मिळविला आहे.

प्रणव मुखर्जी

२५ जुलै, २०१२ रोजी भारताचे तेरावे राष्ट्रपती महणून अधिकारपदावर आले. राष्ट्रपतिपदी निवडून येण्यापूर्वी ते केंद्रात अर्थमंत्रिपद भूषवीत होते. तत्पूर्वीही त्यांनी केंद्रात बाणिज्य, परराष्ट्र, संरक्षण, वित्त बांसारखी महत्वाची खाती सांभाळली आहेत. सन १९९१-९६ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. प्रणवजींना त्यांच्या संसदेतील चांगल्या कामगिरी-बद्दल सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून १९९७ मध्ये गौरविण्यात आले. सन २००८ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान देऊन गौरविले गेले.

सन १९८४ मध्ये त्यांची जगातील सर्वोत्कृष्ट पाच वित्तमंत्र्यापैकी एक म्हणून निवड करण्यात आली होती. सन २०१० मध्ये त्याना आशियातील सर्वोत्कृष्ट वित्तमंत्री महणून गौरविण्यात आले. प्रणबदा चांगले वाचक व वक्ते म्हणूनही सर्वांना परिचित आहेत. त्यांनी Beyond Survival Emerging Dimensions of Indian Economy-1984, Off the Track-1987, Saga of struggle and sacrifice 1992 आणि Challenges Before the Nation (भारतीय राष्ट्रीय अधिसवर आधारलेले)-१९९२ या पुस्तकांचे लेखनही केले आहे. सन २०१९ मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले आहे.

रामनाथ कोविद

जन्म: १ ऑक्टोबा, १९४५ रोजी उत्तर प्रदेशात कानपुर (ग्रामीण) जिल्ह्यात डेरापूर येथे. २५ जुलै, २०१७ रोजी भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोविंद यांनी सूत्रे हाती घेतली. कोविंद यांनी कानपूरमधील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातून वाणिज्य शाखेची तर कानपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. सन १९७७ मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे खाजगी सचिव म्हणून रामनाथ कोविंद यांनी काम पाहिले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती; परंतु सेवेत रुजू न होता त्यानी दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली.

सन १९८० ते १९९३ या कालावधीत ते सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील होते. सन १९९४ ते २००६ या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. राष्ट्रपतिपद ग्रहण करण्यापूर्वी सन २०१५ पासून २४ जुलै, २०१७ पर्यंत ते बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. सन १९९१ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सन १९९४ ते २००६ या काळात ते राज्यसभा सदस्य होते.

माजी राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्यानंतर अनुसूचित जातीमधून राष्ट्रपतिपदी विराजमान होणारे रामनाथ कोविंद हे दुसरे राष्ट्रपती होत. सन २००२ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेो। भारताचे नेतृत्च केले होते. ते लखनौ येथील डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य होते. राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत रामनाथ कोविंद बांना ६५.६५ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना ३४. ३५ टक्के मते मिळाली.

द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५व्या आणि सध्याच्या राष्ट्रपती आहेत. रामनाथ कोविंद नंतर द्रौपदी मुर्मू यांनी 25 जुलै 2022 रोजी शपथ घेतली.

 

Leave a Comment