अनुवंशिकत्व आणि उत्क्रांती | Genetics and evolution Information in Marathi
मानवी शरीरातील निरनिराळ्या पेशींना भिन्न भिन्न कामे वाटून देण्यात आलेली आहे. जननेंद्रियांतील पेंशीकडे संततीला जन्म देऊन, मानव वंशाचे सातत्य टिकविण्याचे काम असते. मानवी शरीरातील इतर अवयवातील पेशीतील गुणसूत्रे दुभंगतात. मात्र जननपेशीतील गुणसूत्रे दुभंगत नाहीत. पुरुष बीज आणि स्त्रीबीज यातील समान गुणधर्म असलेल्या गुणसूत्रांचा संयोग होऊन, ज्या बिजातील गुणधर्म अधिक प्रभावी असेल, त्यानुसार जन्माला येणाऱ्या आपत्याची गुण वैशिष्ट्ये निर्धारीत होतात. शास्त्रीय परिभाषेत जी लिंगसूत्रे लांब असतात त्यांना x गुणसूत्रे व जी आखूड असतात त्यांना गुणसूत्रे y असे म्हणतात. स्त्रीच्या प्रत्येक xx लिंग गुणसूत्रांची व पुरुषाच्या xy पेशीत गुणसूत्रांची एकेक जोडी असते. त्यांच्या संयोगातून संततीचे लिंग निर्धारित होते.
प्रजोत्पादनाची प्रक्रिया सजीवसृष्टी अस्तित्वात आल्यापासून प्रचलित असली तरीही नव्याने जन्माला येणारी संतती कोणत्या लिंगाची असेल, या भेदाचा उकल मानवास करता आला नव्हता. 19 व्या शतकात मेंडेल या शास्त्रज्ञाने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता वाटाण्याच्या झाडावर एक प्रयोग केला. वाटाण्याची उंच व आखूड जातीची झाडे असतात. त्याने या दोन जातीमध्ये संकर घडवून आणला. या कलमी झाडापासून जे वाटाणे मिळाले, त्याचे बिजारोपण केले असता, पहिल्या पिढित सर्वच झाडे उंच प्रकारची झाडे निपजली. या संकरीत उंची झाडाच्या दुसऱ्यांदा रोपण करता, उंच व आखूड अशा दोन्ही प्रकारची झाडे निपजली. यावरून मेंडेलने पुढील निष्कर्ष काढले.
1) दोन परस्पर विरोधी गुणांच्या संमीलनाने तयार होणाऱ्या पहिल्या पिढीत त्यापैकी एकच गुण उतरतो, दुसरा गुण सुप्तावस्थेत राहतो. जो गुण पहिल्या पिढीत उतरतो तो प्रभावी गुण (Dominant character) व जो सुप्तावस्थेत राहतो तो सुप्त गुण (Recessive character) होय.
2) दुसऱ्या पिढीत प्रभावी गुण, संकरित गुण व सुप्त गुण यांचे प्रमाण 1:2:1 असे असते.
3) संकरीत वनस्पतीत दोन परस्पर विरोधी गुणांचे मिश्रण होत नाही.
विसाव्या शतकात अधिक शक्तिशाली सूक्ष्मदर्शकांच्या साहाय्याने मेंडेलच्या संशोधनाचे अधिक तपशीलवार संशोधन शक्य झाले. गुणसूत्रे मुख्यतः ‘डी.एन.ए’ ची बनलेली असतात. डी.एन.ए. म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अॅसिड होय. फॉस्फरिक आम्ल, डिऑक्सिरायबोझ शर्करा व एक नाट्रोजनयुक्त पदार्थ हे तीन घटक डीएनए रेणूमध्ये असतात. वरील तिघांना मिळून न्यूक्लिओटाइड असे म्हणतात. डीएनए च्या रचनेचा शोध बॅटसन आणि क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी लावला. संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणजे गुणसूत्रांवरील मण्याचे स्पष्टीकरण होय. डीएनएच्या रेणूतील रेणूखंड म्हणजे वंशसूत्रे (Genes) असा शोध 1902 साली सुटोन या शास्त्रज्ञाने लावला. बावरी, दब्राईस, मार्गन इत्यादी संशोधकानी ‘जिन्स’ च्या संशोधनाची पुष्टी केली. या शास्त्रज्ञांच्या मते, युग्मकांमधील गुणसूत्रे (Chromosomes) मातापित्यांकडून आलेली असतात. ही यूग्मके जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांतील गुणसूत्रातील जीन्स नव्या जीवाची लक्षणे निर्माण करतात. अशा रीतीने मात्यापित्यांची आनुवंशिकतेची लक्षणे नव्या संततीत संक्रमित करण्यामध्ये जीन्सचा प्रमुख भाग असल्यामुळे त्यांना अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक असे म्हणतात.
विसाव्या शतकात जीन्स म्हणजेच बंशसूत्रांचा शोध लागल्याने आनुवंशिक गुणवैशिष्ट्ये वंशसूत्राच्या प्रभावामुळे, मातापित्याकडून त्यांच्या संततीकडे संक्रमित होतात, हे प्रस्थापित झाले. त्यामुळे एकाच दाम्पत्याच्या संततीतील वेगळेपणा त्यांची सबलता वा दुर्बलता, बुद्धिमत्ता वा बुद्धिहीनता, त्यांचा रंग व शरीराची ठेवण इत्यादी सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळाले. याच क्षेत्रातील पुढील संशोधनामुळे संततीच्या गुणवैशिष्ट्यांची विभागणी कशी होते याचे सूत्रही निर्धारीत करता येणे शक्य झाले. संततीच्या कोणत्याही विशेष गुणांपैकी आई व वडील यापैकी प्रत्येकी 1/4 याप्रमाणे 1/2 भाग माता-पित्यांकडून मिळतो. पित्याचे वडिल, पित्याची आई, मातेचे वडील, मातेची आई याकडून प्रत्येकी 1/16 म्हणजे एकूण 1/4 भाग आजा आजी कडून मिळतो व याच हिशोबाने मागील सर्व पिढ्या कमीत कमी प्रमाणात विशेष गुणातील आपला हिस्सा 1/2 + 1/4 + 1/8 ……. या श्रेणीनुसार उचलतात. या श्रेणींची बेरीज 1 असते, यावरून असे म्हणता येईल की अपत्यातील कोणताही विशेष त्याच्या पूर्वजांच्या विशेषाचे संमिश्रण असते.
या संशोधनाचा सर्वांत अलीकडचा टप्पा म्हणजे जैविक अभियांत्रिकी (Genetic Engineering) होय. या तंत्राचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या सुधारित संकरित (Hybrid) जाती तयार करण्यात आल्या, पशुधनाची गुणवत्ता सुधारता आली. त्याच तंत्राद्वारे मानवसंततीतील आनुवंशिक स्वरूपाचे दोष दूर करण्यासंबंधीचे संशोधन चालू आहे. मनोवांच्छित संततीची प्राप्ती याद्वारे शक्य होईल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
उत्क्रांती (Evolution):
उत्क्रांती म्हणजे काळाच्या ओघात, रप्प्या-टप्प्याने होणारा विकास जीवशास्त्रात सजीवाची चाळीस दशलक्ष वर्षात झालेली उत्क्रांती हा अत्यंत महत्वपूर्ण संशोधनाचा विषय आहे. अति-प्राचीन कालखंडातील सजीवाची परिस्थिती आणि घटकांचे वर्णन करताना काही प्रमाणात शास्त्रीय तंत्राच आणि काही प्रमाणात तर्कशक्तीचा वापर करावा लागतो. त्यामुळे निष्कर्षांबाचत काहीशी अनिश्चिततेची जाणीवही निर्माण होते. भौतिकशास्त्रातील साधनांची उपलब्धता, संबंधित विषयाबद्दल उपलब्ध झालेला पुरावा इत्यादींच्या साहाय्यानेच काही निश्चित तर्क बांधता येतात. पृथ्वीवर सुमारे चार अब्ज वर्षापूर्वी जीवनिर्मिती झाली असावी याबाबत जीवशास्त्रज्ञात एकमत आहे. निर्जीव पदार्थाच्या रेणूच्य मिश्रणातून, रासायनिक प्रक्रिया घटून, जीवनिर्मिती झाली असावी. त्यांनतर अत्यंत सुटसुटीत सजीवापासुन अधिक गुंतागुंतीच्या सजीवाची उत्क्रांती झाली असावी. त्याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीवांची रचना, जडणघडण व रेणूरचना जवळजवळ सारखीच आहे हे सत्यच या गृहीततत्वाचा आधार आहे.

उत्क्रांती जीवविज्ञानातील एक महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. पृथ्वीतलावर फार पूर्वी सजीवांची निर्मित झाली. पहिल्या सजीवांची रचना साधी होती. त्यात सतत बदल होत होत हळूहळू गुंतागुंतीची रचना असलेले प्राणी निर्माण झाले. आज अस्तित्त्वात असलेले विविध व विकसित सजीव, त्यांच्या पूर्वजापासून बदल होऊन निर्माण झाले हे विशद करणारे तत्व म्हणजेच सजीवांची उत्क्रांती होय. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील दशावतार सिद्धांत या उत्क्रांतीमधील व्यापक टप्पे अतिशय व्यवस्थितपणे व्यक्त करतो. प्रथम जलचर (मत्स्यावतार), जल-स्थलचर (कासव), स्थलचर (वराह) अर्धमानव (नरसिंह), आदिमानव (वामन) अशा पाच प्रमुख टप्प्यात सजीवांची उत्क्रांती विशद करण्यात आली आहे.
कोणत्याही वैज्ञानिक संशोधनात त्यातील उपपत्तींना पुरावे द्यावे लागतात. उत्क्रांती तत्त्वालाही असे पुरावे संशोधकांनी दिली आहेत.
1) शरीररचना: उत्क्रांती तत्वाचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा सजीवांची शरीरचना हा आहे. मानवाच्या डोळ्यात नाकाजवळील कोपऱ्यात असलेला अर्धचंद्राकार पडदा तिसरी पापणी म्हणून वापरला जाई, अंगावर माशी बसली की जनावरे कातडी हालवितात. कातडीखालील स्नायूमुळे ही हालचाल होते. सध्या मानवाच्या कपाळाच्या कातडीखाली स्नायू आहेत. मानबाला शेपूट नाही पण शेपटीची हाडे व शेपटी हालविण्याकिरता लागणारे स्नायू आहेत. अॅपडिंक्स हा सध्या मानवः शरीरात असलेला भाग आज निरुपयोगी आहे. पण ज्यावेळी मानव गवत खात होता त्यावेळी तो पचनाला उपयोगी होता.
2) गर्भवाद: सुश्रुत संहितेत सजीवाच्या गर्भवाढीचे टप्पे दिलेले आहेत. मासा, कासव, वराह याचे गर्भकाही अवस्थेपर्यंत अगदी सारखे असतात. पुढे पुढे त्यात बदल होत जातो. उत्खननात मिळालेल्या विविध वस्तु, अनेक प्राण्यांचे सांगाडे या अवशेषाचा व विधमान जिवाच्यात फरक आढळतो.
तर मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला अनुवांशिकत्व आणि उत्क्रांती याबद्दल या लेखात दिलेली माहिती समजली असेल काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा. जर तुम्ही आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर हा विडिओ नक्की बघा.









