मध्ययुगीन भारतातील भक्तिपंथ व सुफीपंथ | Bhaktipanth and Sufipath in medieval India
भक्तिपंथ
हिंदू धर्मात भक्तिपंथाचा उदय मध्ययुगीन काळात झाला असे काही विद्वानांचे मत आहे; परंतु हे मत पूर्णपणे बरोबर वाटत नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासावरून असे दिसून येते की, मध्ययुगीन काळाच्या अगोदरही भारतीय लोक आत्म्याच्या मुक्तीचा एक मार्ग म्हणून भक्तिपंथाकडे बळले होते.
बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर वैदिक धर्मातही परिवर्तन होऊ लागले, बज्ञयाग, कर्मकांड इत्यादी गोष्टीना फाटा देण्यात आला. ईश्वराची सगुण रूपात भक्तिभावाने आळवणी करून ईश्वराशी तादात्म्य साधणे हा मार्ग सर्वसामान्य लोकांना अधिक प्रिय व सोपीचा वाटू लागला. त्यातूनच भक्तिपंथाचा उदय झाला. प्राचीन काळातील वैष्णव पंथ, शैव पंथ यांसारखे पंथ हे भक्तिपंधाचेच आविष्कार होत. जातपात, भेदभाव, उच्च-नीचता, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा या हिंदू धर्मातील दोषांवर आघात करीत करीत सामाजिक समतेचा पुरस्कार करणारी, भक्तिमार्गाची शिकवण देणारी चळवळ म्हणजेच भक्तिपंथ होय. भारतीय तत्त्वज्ञानात ईश्वरप्राप्तीचे ज्ञान, कर्म व भक्ती हे जे तीन मार्ग सांगितले आहेत, त्यांपैकी भक्तिमार्गाचा स्वीकार या पंथाने केला.
या पंथाने दुर्बल व असमर्थ बनत चाललेल्या तत्कालीन हिंदू धर्मास जशी संजीवनी दिली तशीच हिंदु मुस्लीम यांचे धार्मिक ऐक्य साधण्याची मोलाची कामगिरीही बजाविली, मुस्लीम धर्मातील समतेच्या तत्त्वज्ञानाचा या चळवळीवर काही अंशी प्रभाव पडला होता, असेही काही जणांचे म्हणणे आहे. मध्ययुगीन काळातील भक्तिपंथाचे प्रवर्तक म्हणून रामानुज यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील बारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी इत्यादी संत; तसेच रामानंद, वल्लभाचार्य, कृष्णचैतन्य, कबीर यांसारख्या विभूतीनी भक्तिपंथाची चळवळ पुढे नेली. रामानुज
रामानुजांनी शंकराचार्यांच्या मायावादाचे खंडन केले च विशिष्ट अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. आत्मा हा परमेश्वर-पासून निर्माण होतो; पण त्यानंतर त्यास वेगळे, स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते असे त्यांनी सांगितले, ते वैष्णावपंथी होते आणि अवतारकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. ईशाची भक्तिभावाने उपासना करणे हा मुक्तीचा मार्ग होय असे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर यांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानेश्वरांनी ‘सर्वांभूती समानता’ व ‘ज्ञानयुक्त भक्ती’ची शिकवण दिली. सगुणभक्तीला अद्वैत तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळवून दिले. धर्मश्रद्धेला उच्च नैतिक विचारांची बैठक दिली आणि अद्वैत तत्त्वज्ञानाच्या आधारे उच्चवर्णीयांपासून शूद्रातिशूद्रांपर्यंत सर्व लोकांना भागवत धर्माच्या एकाच व्यासपीठावर आणले.
नामदेव
वारकरी संप्रदायातील हे आणखी एक महान संत होते. त्यांनी जातिभेद व धर्मातील दांभिकपणा यांना विरोध केला. नामदेवांनी दोन वेळा भारतयात्रा करून उत्तरेत- विशेषतः पंजाबात भागवत धर्माच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांचे काही अभंग गुरू ग्रंथसाहिबमध्येही समाविष्ट आहेत, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणी त्यांची मंदिरे आहेत.
रामानंद
यांना श्रीस्वामी रामानंद असेही म्हटले जाते. ते चौदाव्या शतकात होऊन गेले. त्यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी सर्व भारतभर प्रवास केला व अखेरीस काशी येथे ते स्थायिक झाले. त्यांनी राम-सीता यांच्या भक्तीला प्राधान्य दिले. त्यांचा जातिभेद व अस्पृश्यता यांना विरोध होता. जातिव्यवस्थेवर त्यांनी टीका केली होती. त्यांनी आपल्या मतांचा प्रचार सर्वसामान्यांच्या हिंदी भाषेतून केला.
श्रीवल्लभाचार्य
यांचा जन्म इ. स. १४७९ मध्ये झाला, त्यांनी कृष्णभक्तीचा प्रचार केला. कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यानी शुद्ध द्वैतवादाचा पुरस्कार केला. परंतु, पुढे त्यांच्या संप्रदायात काही दोष शिरले.
श्रीचैतन्य महाप्रभू
यांना कृष्णचैतन्य असेही म्हटले जाते. त्यांचा जन्म इ. स. १४८६ मध्ये बंगालमधील नादिया गावी झाला. त्यांनी कृष्णभक्तीला महत्व दिले. समाजातील उच्चनीच भेदभाव, जातिभेद बांस त्यांचा विरोध होता. मानवामानवांमधील समानतेवर त्यांचा विश्वास होता. हिंदू धर्मातील कर्मकांड व पुरोहित वर्गाचे वर्चस्व यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांनीही सर्व भारतभर प्रवास केला व अखेरीस जगनाथपुरी येथे ते स्थायिक झाले.
कबीर
हे रामानंदांचे शिष्य होते. त्यांचा जन्म इसवी सन १४४० मध्ये झाला. कबीरांनी हिंदु-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार केला. राम व रहीम है एकच असून हिंदू व मुसलमान यांच्यात कसलाही भेद नाही अशी त्यांची शिकवण होती. समाजातील रूढी, परंपरा, जातिभेद इत्यादी गोष्टींना त्यांनी जोरदार विरोध फेला. ते एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
गुरूनानक
हे शीख धर्माचे संस्थापक होत. त्यांचा जन्म पंधराव्या शतकात पंजाबमधील एका खेड्यात झाला. त्यांचा मूर्तिपूजा,कर्मकांड इत्यादी गोष्टीना विरोध होता. त्यांनी हिंदु मुस्लीम ऐक्यावर भर दिला. त्यांची शिकवण ‘गुरू ग्रंथसाहिब या ग्रंथात ग्रंथित केली असून शीखांचा तो पवित्र धर्मग्रंथ मानला जातो. त्यांना जातिप्रथा, उच्चनीच भेदभाव मान्य नव्हते.
सुफीपंच
मध्ययुगीन काळात ज्याप्रमाणे हिंदू धर्मात भक्ति-पंथाचा प्रसार होऊन भक्ती, प्रेम, समानता इत्यादी तत्त्वांचा विकास झाला, त्याचप्रमाणे मुस्लीम धर्मातील काही संतांनीही प्रेम व भक्ती यांचा संदेश दिला. या संतांना सुफी संत असे म्हटले जाते. त्यांचा पंथ म्हणजेच सुफीषध किंवा सुफी संप्रदाय होय. सुफीपंथाचा उदय पर्शियात झाला असे समजले जाते. शेख अली बिन उस्मान अल-हुमरीबांना भारतातील सुफीपंथाचा जनक मानले जाते, भारतात होऊन गेलेले महत्त्वाचे सुफी संत पुढीलप्रमाणे-
ख्वाजा मुईनुद्दीन चिस्ती
यांचा जन्म मध्य आशियात इ.स. १९४१ मध्ये झाला, पुढे ते भारतात आले आणि अजमेर येथे स्थायिक झाले, जगातील सर्व धर्माचे उगमस्थान एकच आहे. ईश्वर एकच असून निरनिराळे धर्म मागने ईश्वराकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग होत, अशी त्यांची शिकवण होती. अजमेर येथे त्यांबा दर्गा असून हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्माचे लोक त्यांचे उपासक आहेत.
शेख निजामुद्दीन अवलिया
हे संत शेवटचे खिलजी सुलतान व प्रारंभीचे तुपलक मुलतान गांना समकालीन मानले जातात. ते दिल्ली येथे मास्तम्य करून होते. हिंदू व मुसलमान हे एकच आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले
बाबा फरीद
यांचा जन्म काबूलच्या राजघराण्यात झाला. त्याच्या आजोबांनी काही कारणाने काबूल सोडले व ते मुलतान येथे वास्तव्यास आले. मानवजातीवर प्रेम करण्याचा संदेश त्यांनी लोकांना दिला. हिंदू व मुस्लीम हे दोघेही त्यांचे अनुवाबी होते. याशिवाय शेख सदुद्दीन, शफुद्दीन मुनेरी, निजामुद्दीन चिस्ती, बहाउद्दीन सकरिया, कुतुबुद्दीन बख्तियार काकी इत्यादी अनेक संत सुफी संप्रदायात होऊन गेले. सुफीपंथात पुढे अनेक उपपंच निर्माण झाले. त्यांपैकी चिस्ती, सुन्हावर्दी, नक्षबंदी व काद्री है उपपंथ महत्त्वाचे मानले जातात.
विजयनगर व बहामनी साम्राज्य
विजयनगर साम्राज्य
भारतात उत्तरेत दिल्लीच्या सुलतानशाहीचा अंगल होता आणि या सुलतानांनी आपली सत्ता भारताच्या इतर प्रदेशांवरही पसरविण्याचा प्रयत्न चालविला होता, तेव्हा दक्षिण भारतात एका हिंदू राज्याचा उदय होऊ लागला होता. हे राज्य म्हणजेच विजयनगरचे राज्य होय. विजयनगरच्या राज्याच्या उत्पत्तीविषयी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात; पण विश्वसनीय ऐतिहासिक साधनांच्या अभावी त्यांची सत्यासत्यता पडताळून पाहणे कठीण आहे.
हरिहर व बुक्क
विजयनगरच्या राज्याचे संस्थापक हरिहर मुक्क हे दोन बंधू होते, पाबद्दल वाद नाही. सुरुवातीला ते दोघे जण वरंगळचा राजा प्रताप रुद्रदेव याच्या सैन्यात नोकरीस होते; पण पुढे मुस्लिमांनी वरंगळ काबीज केल्यामुळे ते अणेमुडीच्या होपसळ राजाकडे नोकरीस आले; पण मुहंमद तुघलकाने अणेगुंडीवर स्वारी करून तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्या वेळी मुहंमद तुघलकाने हरिहर व बुक्क यांच्यावर रायचूरच्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपविली.
हरिहर व युवक यांनी मुहंमदाच्या दक्षिणेतील अनुपस्थितीचा लाभ उठविला आणि आपल्या स्वतंत्र राज्याच्या स्थापनेची घोषणा केली त्यानी विजयनगर या राजधानीच्या शहराचीही स्थापना केली. इ. स. १३३६ मध्ये हे नवे हिंदू राजा अस्तित्वात आले. हरिहर व बुक्क यांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापन केल्यावर त्या राज्याचा विस्तार करण्याकडे लक्ष पुरविले, लवकरच त्यांनी कृष्णा व कावेरी या दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या सर्व प्रदेशांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. हरिहर हा विजयनगरच्या राज्याचा पहिला राजा बनला, तो एक उत्तम प्रशासकही होता. त्याने विजयनगरच्या राज्याच्या प्रशासनाची उत्तम घड़ी आपल्या कारकिर्दीत बसविली होती. इ. स. १३५३ मध्ये तो मृत्यू पावला.
हरिहरनंतर त्याचा भाऊ बुक्क हा विजयनगरचा राजा बनला, तोदेखील आपल्या थोरल्या भावाप्रमाणेच शूर, पराक्रमी व मुत्सद्दी राज्यकर्ता होता. त्याने आपल्या कारकिर्दीत विजयनगरच्या राज्याचा विस्तार घडवून आणला. बुक्कच्या कारकिर्दीत दक्षिणेत मुसलमानांचे बहामनी राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे ददिगतील या दोन राज्यांत वारंवार संघर्ष होऊ लागले, बुक्क माने चौरच्या राजाशीही संबंध जोडले होते. इ.स. १३७७ मध्ये त्याचे निधन झाले.
नंतरचे राजे
बुक्क याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हरिहर दूसरा (१३७७-१४०४) हा गादीवर आला. त्याने ‘महाराजाधिराज’ हा किताब धारण केला होता. त्याच्यानंतर पहिला विरुपाक्ष, दुसरा बुक्क, पहिला देवराय, विजयकुक्क हे राजे गादीवर आले. (२) इ. स. १४२२ मध्ये देवराय दुसरा हा विजयनगरचा राजा बनला. त्याने आपल्या राज्याची सत्ता वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले, त्याला एकदा बहामनी सुलतानकडून पराभवही
दुसन्या देवरायाच्या कारकिर्दीत निकोलो कोटी हा इटालियन प्रवासी व अब्दुल रझाक हा पर्शियन राजदूत विजय-नगरला आले होते. इ. स. १४४६ मध्ये दुसऱ्या देवरायाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मल्लिकार्जुन, किपाक्ष दुसरा हे राजे गादीवर आले. विषपाया दुसरा गास नरसिंह याने पदच्युत वरून सत्ता बनविली. अशा प्रकारे हरिहरने स्थापन केलेल्या संगम घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन शालुव घराण्याची सत्ता सुरू झाली. शालुब घराण्याचा दुसरा राजा इम्मादी नरसिंह यास तुलुव घराण्यातील वीर नरसिंह याने पदच्युत केले आणि विजय-नगावर आपल्या घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. आता विजय-नगरवर तिसऱ्या घराण्याचे राज्य सुरू झाले.
कृष्णदेवराय
वीर नरसिंहनंतर त्याचा भाऊ कृष्णदेवराय (इ. स. १५०९-३०) हा विजयनगरच्या गादीवर आला. विजयनगरच्या साम्राज्याचा तो सर्वश्रेष्ठ सम्राट मानला जातो. कृष्णदेवराय एक पराक्रमी योद्धा व उत्कृष्ट सेनापती होता. साहजिकच त्याने युद्धांत अनेक विजय मिळविले. इ. स. १५२० मध्ये त्याने विजापूरच्या आदिलशहाचा केलेला पराभव हा त्याचा महत्त्वाचा विजय मानला जातो. एक उत्कृष्ट शासनकर्ता माणूनही कृष्णदेवराय ओळखला जातो. आपल्या प्रजेच्या हिताची त्याने नेहमीच काळजी घेतली. तो विद्या व कला यांचा प्रेमी आणि विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरचे वैभव व प्रतिष्ठा कळसास पोहोचली.









